शाओमी रेडमी 7 लॉन्च, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह शानदार स्टाईल व दमदार स्पेसिफिकेशन्स

शाओमी ने काही दिवसांपूर्वी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला होता. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात हिट झाले आहेत. विशेष म्हणजे भारताआधी रेडमी नोट 7 चीन मध्ये लॉन्च केला गेला होता जो यशाचे विक्रम करून भारतात आला होता. आज शाओमी ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला अजून एक नवीन प्रोडक्ट सादर करत रेडमी 7 आणला आहे. शाओमी ने रेडमी 7 सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जो येत्या काळात भारतासहित जगभरातील मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी 7 चा लुक
रेडमी 7 पण शाओमी ने रेडमी नोट 7 प्रमाणे डॉट-ड्रॉप नॉच वर सादर केला आहे. फोनच्या तिन्ही कडांवर बारीक बेजल्स दिसत वाईट तर खालच्या बाजूला मोठा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेवर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. रेडमी 7 च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्सना गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये ​डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्याखाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. रेडमी 7 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट खालच्या पॅनल वर दिला जाईल.

शाओमी रेडमी 7 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 7 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 1520 × 720 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या एचडीप्लस टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी या फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला 5 चा वापर करण्यात आले आहे. रेडमी 7 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह बाजारात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे.

एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च

चीन मध्ये रेडमी 7 तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या तिन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी रेडमी 7 च्या नॉच मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रेडमी 7 मध्ये 4जी एलटीई व डुअल सिम तसेच अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. शाओमीने रेडमी 7 3.5एमएम जॅक सह बाजारात आणला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चीनी बाजारात हा फोन येत्या 26 मार्च पासून ब्लू, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी 7 ची किंमत
2जीबी रॅम / 16जीबी मेमरी = 699 युआन (जवळपास 7,150 रुपये)
3जीबी रॅम / 32जीबी मेमरी = 799 युआन (जवळपास 8,200 रुपये)
4जीबी रॅम / 64जीबी मेमरी = 999 युआन (जवळपास 10,200 रुपये)

रेडमी नोट 7 प्रो चाइना लॉन्च
रेडमी 7 सोबत शाओमी ने चीन मध्ये रेडमी नोट 7 प्रो पण लॉन्च केला आहे. चीन मध्ये हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डॉट-नॉच वर लॉन्च केला आहे. चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वर लॉन्च झाला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर आणि 5-मेगापिक्सल सेकेंडरी डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here