शाओमी सादर करू शकते हा खास फोन, उन्हामुळे होईल चार्ज

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी अनेक दिवसांपासून आपले नवीन स्मार्टफोन सोबतच नवीन इनोवेटिव प्रॉडक्ट्स सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कंपनी एक खास स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. शाओमीच्या या अपकमिंग स्मार्टफोनच्या मागे सोलर पॅनल असेल. शाओमी ने अशी स्मार्टफोन डिजाइन पेटेंट केली आहे, ज्याच्या मागे सोलर पॅनल असेल. शाओमी मोबाईल सॉफ्टवेयर ने गेल्यावर्षी जुलै मध्ये वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस (WIPO) कडे या स्मार्टफोन साठी पेटेंट अर्ज दिला होता, ज्यात सोलर सेल मॉड्यूल दिला जाईल.

शाओमीने फाइल केलेल्या पेटेंट मध्ये फोनच्या डिजाइनचे काही स्केच दाखवण्यात आले आहेत, ज्यावरून माहिती मिळाली आहे कि कसा दिसेल शाओमीचा हा स्मार्टफोन. फोटो नुसार या स्मार्टफोन मध्ये नो-नॉच डिस्प्ले असेल. सध्यातरी या फोन मध्ये फ्रंट-फेसिंग कॅमेरा कुठे असेल याची माहिती देण्यात आलेली नाही.

फ्रंट कॅमेरा साठी पॉप-अप मॉड्यूल पण दिडायल जाऊ शकतो. आशा आहे कि या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलजीचा पण वापर केला जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल. बॅक पॅनल मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नसेल, बोलले जात आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मॉड्यूल असू शकतो.

मागे असेल सोलर पॅनल

या फोनची खासियत यात दिला जाणारा बॅक सोलर पॅनल असू शकते. हा फोनच्या मागील मोठा भाग व्यापून घेईल. फोनच्या मागील सोलर पॅनल मधून तुम्ही फोन उन्हाने चार्ज करू शकाल. पण हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल हे स्पष्ट झाले नाही.

अलीकडेच Xiaomi Vice President आणि Redmi चे General Manager Lu Weibing ने कंपनी संबंधित एक मोठी माहिती दिली आहे. लू ने इंटरनेट वर पोस्ट करून सांगितले होते कि कंपनीने आपल्या आगामी रेडमी नोट डिवाईस साठी Redmi Note 8 सीरीज वर काम सुरु केले आहे. या सीरीज अंतर्गत किती स्मार्टफोन मॉडेल येतील हि माहिती तर मिळाली नाही पण Redmi Note 8 सीरीजचा खुलासा करण्यासोबतच वेईबिंग ने असा दावा केला आहे कि Redmi Note 8 स्मार्टफोन सीरीजचा स्मार्टफोन खूप पावरफुल असेल.

काही दिवसांपूर्वी Redmi ब्रँडने सांगितले होते कि कंपनी अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात MediaTek Helio G90T चिपसेट दिला जाईल. हा चिपसेट मीडियाटेक द्वारा लॉन्च केला गेलेला सर्वात नवीन चिपसेट आहे जो आक्टाकोर प्रोसेसेर सह चालतो. यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेले 2 Cortex-A76 कोर आणि 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणारे 6 Cortex-A55 कोर देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here