साल 2019 मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले. यात ज्या फीचर वर सर्वात जास्त लक्ष देण्यात आले तो म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा होता. यावर्षी लॉन्च झालेल्या स्माटफोन्स मध्ये 48 मेगापिक्सल पासून 108 मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा होता. आता समोर आलेल्या माहिती नुसार सॅमसंग 144 मेगापिक्सल कॅमेरा वर काम करत आहे. रिपोर्ट्स नुसार सॅमसंग पुढच्यावर्षी Galaxy S11 108 मेगापिक्सल कॅमेरा सह सादर करू शकते.
प्रसिद्ध लीक्सटर आइस यूनिवर्सने ट्विट करून याची माहिती दिली आहे कि सॅमसंग 144 मेगापिक्सल कॅमेऱ्यावर काम करत आहे. हा 144 MP कॅमेरा सेंसर बनवण्यासाठी कंपनी 14nm FinFET प्रोसेसरचा वापर करेल. आइस यूनिवर्सने 144MP कॅमेऱ्याची इंफोग्राफिक इमेज पण पोस्ट केली आहे. 14nm प्रोसेसिंगच्या माध्यमातून 100 मिलियन पेक्षा पण जास्त पिक्सल डेंसिटी सह सेंसर डेवेलप करता येईल. हा सेंसर बनवण्यासाठी FinFET टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या सेंसरचे पावर कंजम्शन पण कमी असेल. याव्यतिरिक्त 144MP सेंसर बद्दल जास्त माहिती समोर आली नाही.
Crazy, Samsung is planning to use a 14nm process to make 144MP sensors. pic.twitter.com/H9PvLUuqYY
— Ice universe (@UniverseIce) December 16, 2019
याआधी शाओमीने 108 मेगापिक्सल असलेला Mi Note 10 लॉन्च केला आहे. आता हा भारतात पण सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शाओमीचा Mi Note 10 स्मार्टफोन 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. 91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे कि Mi Note 10 Xiaomi जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च करू शकते आणि या फोनची किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असेल.
91मोबाईल्सला Mi India Community वेबसाइट वर Mi Note 10 चे पेज मिळाले होते ज्यावर Xiaomi ने एक फोटोग्राफी स्पर्धा चालू केली आहे. या स्पर्धेत 19 जानेवारी पर्यंत एंट्री घेता येईल आणि विजेत्यांची घोषणा 5 फेब्रुवारीला केली जाईल. या स्पर्धेच्या विजेत्याला Mi Note 10 स्मार्टफोन दिला जाईल. वेबपेज वर Mi Note 10 ची किंमत 46,832 रुपये सांगण्यात आली आहे जी अमेरिकन डॉलर नुसार आहे. त्यामुळे आम्हाला वाटते कि भारतात हा फोन 40,000 तुप्यांच्या असपास लॉन्च होईल. तसेच स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा पण फोन बाजारात लॉन्च झाल्यावर होईल.














