गेल्याच आठवड्यात Xiaomi संबंधित एक बातमी समोर आली होती कि कंपनी नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी वर काम करत आहे जी 66W fast charging technology नावाने सादर केली जाईल. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4,800एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन 35 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. Xiaomi ने अजून या टेक्नॉलॉजी बद्दल अधिकृत खुलासा केला नाही. तर दुसरीकडे शाओमीची मोठी प्रतिस्पर्धी कंपनी बनलेल्या Realme बद्दल पण धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. बातमी मिळाली आहे कि Realme पण नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी वर काम करत आहे आणि हि Realme Dart आणि Realme SuperDart नावाने बाजारात येईल.
Realme Dart आणि Realme SuperDart बाबतीत लीक समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हि कंपनी पण या नवीन चार्जिंग टेक्नॉलॉजी वर काम करत आहे. लीक नुसार Realme ने आपल्या चार्जिंग टेक्नोलॉजीच्या नावासाठी ट्रेडमार्क फाइल केला आहे आणि टिपस्टरने या ट्रेडमार्कचा फोटो इंटरनेट वर शेयर केला आहे. शेयर केलेल्या फोटो मध्ये चार्जिंग टेक्नोलॉजीच्या नावाची माहिती मिळाली आहे, सोबतच या दोन्ही टेक्नॉलॉजीचा लोगो पण लीक झालेल्या फोटो मध्ये समोर आला आहे.
Realme SuperDart could be the next charging tech by Realme. Gets trademarked.#Realme #SuperDart #RealmeSuperDart pic.twitter.com/x3R2Y9ndHU
— Mukul Sharma (@stufflistings) December 28, 2019
Realme Dart आणि SuperDart
Realme Dart आणि Realme SuperDart बाबतीत सांगण्यात आले आहे कि SuperDart टेक्नॉलॉजी रियलमी द्वारा Xiaomi च्या 100W Super Charge Turbo fast charge technology ला टक्कर देण्यासाठी सादर केली जाईल. Dart थोडी कमी वॉट असलेली फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल. विशेष म्हणजे शाओमीची 100वॉट सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 4,000एमएएच ची बॅटरी 17 मिनिटांत 0% ते 100% चार्ज करते.
Realme सध्या Oppo च्या VOOC flash Charge technology ला सपोर्ट करते. अलीकडेच Realme X2 Pro स्मार्टफोन रियलमी ब्रँडचा सर्वात वेगवान चार्ज होणारा स्मार्टफोन आहे जो 50वॉट सुपरवूक फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. या फोन मध्ये बॅटरी 35 मिनिटांत फुल चार्ज करता येते. तर 7 जानेवारीला लॉन्च होणाऱ्या कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Realme X50 5G मध्ये पण VOOC 4.0 Flash Charge technology मिळेल जी 30 मिनिटांतच फोन बॅटरी 70 टक्के चार्ज करेल. लीकनुसार Realme X50 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.
Xiaomi 66W fast charging system बद्दल बोलायचे तर लीक नुसार ब्रँडचा आगामी डिवाईस Mi 10 Pro या टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन 35 मिनिटांत फुल चार्ज करता येईल.















