चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo यावर्षी आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. कंपनीने अधिकृतपणे कोणत्याही फोनचे नाव आणि लॉन्च डेट बद्दल माहिती दिली नाही. पण कंपनी आपली V सीरीज वाढवत नवीन हँडसेट बाजारात लवकरच सादर करू शकते.
काही दिवसांपूर्वी एक माहिती समोर आली आहे, जिच्या नुसार वीवो आपल्या वी सीरीज मध्ये Vivo Y50 आणि Vivo Y70 सादर करू शकते. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या नावाची माहिती IMEI डेटाबेस वेबासइटच्या माध्यमातून समोर आली आहे. याचा अर्थ असा आहे कि स्मार्टफोन सध्या सर्टिफिकेशन स्टेज मध्ये आणि काही दिवसांत वीवो Y50 आणि Y70 लॉन्च करू शकते.
Vivo Y50 आणि Y70 चे स्पेसिफिकेशन्स पाहता सध्या यांची कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच अजूनही हा डिवाइस दुसऱ्या कोणत्याही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला नाही. त्यामुळे फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनचा अंदाज लावणे थोडे कठीण आहे. पण आशा आहे कि वीवो ची वाय-सीरीज मध्ये येणारा फोन मिड-रेंज सेगमेंट मध्ये सादर केले जाऊ शकतात. त्यामुळे आशा आहे कि या दोन्हीं फोनचे स्पेसिफिकेशन एकसारखे असतील.
कंपनीने आधीपण वीवो लाइनअपचे अनेक फोन्स स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह सादर केले आहेत. त्यामुळे नवीन वी सीरीजच्या फोन मध्ये हाच चिपसेट दिला जाऊ शकतो. आशा आहे कि वीवो Y50 आणि Y70 मध्ये वॉटरड्रॉप नॉच असू शकते. अलीकडेच GfK च्या एका रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार Vivo ने साल 2019 नोव्हेंबर मध्ये Samsung पेक्षा जास्त स्मार्टफोन्सची विक्री ऑफलाइन बाजारात केली आहे. भारतात एंट्री नंतरची हि वीवो ची मोठी उपलब्धी आहे. डेटा नुसार वीवो चा ऑफलाइन मार्केट शेयर ऑक्टोबर 2019 मध्ये 23 टक्के होता जो 2019 नोव्हेंबर मध्ये 24.7 टक्के झाला. याच काळात सॅमसंगचा मार्केट शेयर 24.7 टक्क्यावरून 21.6 टक्के झाला. तर शाओमी 20.8 टक्क्यांवरून 21.5 टक्क्यांवर पोहचली.















