मुंबईमधील ईव्ही स्टार्टअप PMV Electric नं भारतात आपली पहली electric car लाँच केली आहे. या नॅनो साइज इलेक्ट्रिक कारचा नाव नाव EaS-E ठेवण्यात आलं आहे. पीएमवी इलेक्ट्रिकनं ईएएस-ई 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या बेस किंमतीत लाँच केली आहे, त्यामुळे ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे. परंतु ही किंमत फक्त पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी आहे. तुम्ही ही कार कंपनीच्या वेबसाइटवर फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करू शकता. PMV EaS-E देशात उपलब्ध असलेली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार देखील आहे. यात दोन वयस्कर व्यक्ती आणि लहान मूल असे तीन प्रवासी आरामात बसू शकतात.
EaS-E ची डिजाइन आणि फीचर्स
ही नॅनो साइज इलेक्ट्रिक कार शहरात वापरण्यासाठी डिजाइन करण्यात आली आहे. हिची लांबी 2,915 मिमी, रुंदी1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे. तर व्हीलबेस 2,087 मिमी आणि ग्राउंड क्लीयरेंस 170 मिमी आहे. या EV चं कर्ब वेट जवळपास 550 किलोग्राम असेल. हे देखील वाचा: Jio Vs Airtel: कोणाच्या 199 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळत आहेत जास्त बेनिफिट्स, जाणून घ्या इथे
PMV EaS-E मध्ये सर्कुलर हेडलॅम्प्ससह रुंद LED लाइट बार देण्यात आला आहे, तर टेलगेटवर हॉरिजॉन्टल लाइट बार आहे. Eas-E इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इंफोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एयर कंडीशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूज कंट्रोल, एयरबॅगसह सीट बेल्टचा समावेश आहे. यात विविध राइडिंग मोड्स, फीट-फ्री ड्राईव्हिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, म्यूजिक कंट्रोल, कनेक्टेड स्मार्टफोनवर कॉल कंट्रोलची सुविधा मिळते.
EaS-E ची रेंज
पीएमवीची ही इलेक्ट्रिक कार तीन बॅटरी ऑप्शन्समध्ये उपलब्ध झाली आहे. ईएएस-ई मायक्रो इलेक्ट्रिक कारचा मोठा व्हेरिएंट सिंगल चार्जमध्ये 200 km पर्यंतच्या रेंजसह सादर करण्यात येईल. तर 160 km आणि 120 km ची रेंज देणारे मॉडेल्स देखील बाजारात येतील. ही ईव्ही चार तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होईल. ईएएस-ई मायक्रो कार कोणत्याही 15A आउटलेटद्वारे चार्ज केली जाऊ शकते, यासाठी कंपनी 3 kW AC चार्जर देखील देत आहे. ही इलेक्ट्रिक कार 13hp ची पावर आणि 50Nm पीक टॉर्क देते. EaS-E चा टॉप स्पीड 70 km ताशी आहे. ही फक्त 5 सेकंदात 0 ते 40 km ताशी वेग गाठू शकते.
पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत ईव्हीची डिलिव्हरी सुरु करून आणि ग्राहकांसाठी टेस्ट ड्राईव्ह आयोजित करण्याची योजना कंपनीनं बनवली आहे. पीएमवी ईएएस-ई ला टक्कर देईल अशी कोणतीही इलेक्ट्रिक कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. परंतु एमजी मोटर देखील भारतीय बाजारात किफायती रेंजमध्ये एयर ईव्ही लाँच करणार आहे, जी पुढील वर्षी 5 जानेवारीला सादर होईल. हे देखील वाचा: नॅनोसारखी दिसणारी स्वस्त कार येतेय भारतात; सर्वात छोट्या इलेक्ट्रिक कारच्या लाँच डेटचा खुलासा
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.