काउंटरपॉइंट रिसर्चने आपला एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे, ज्यानुसार साल 2019 मध्ये भारतीय बाजारात प्रीमियम सेगमेंट मध्ये 29 टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. यात वनप्लसच्या शिपमेंट मध्ये 28 टक्के वार्षिक वाढ दिसली आहे. त्यामुळे असे म्हणता येईल कि भारतीय स्मार्टफेन मार्केटच्या प्रीमियम सेगमेंट मध्ये वनप्लसची हवा आहे.
इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार 2019 मध्ये आईफोन XR अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटचा बेस्टसेलिंग स्मार्टफोन आहे. कंपनीने हा डिवाइस साल 2018 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता जो भारतात लोकप्रिय ठरला. या रिपोर्टमुळे स्पष्ट झाले आहे कि आज पण भारतीय ग्राहकांना हा फोन आवडत आहे.

सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या प्रीमियम सेगमेंट शिपमेंट मध्ये 2 टक्क्यांची घाट झाली आहे. तरीही बाजाराचा 26 टक्के हिस्सा कंपनीच्या ताब्यात आहे तर तिसऱ्या स्थानावर Apple आहे. भारतात ऍप्पलचा मार्केट शेयर 25 टक्के आहे.
अलीकडेच एक दुसरा रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार भारतात आता 50 कोटी पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यावर्षी 2018 च्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. रिसर्च फर्म techARC ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार डिसेंबर 2019 पर्यंत इंडियन मार्केट मध्ये स्मार्टफोन यूजर्सची संख्या 502.2 मिलियन (50.22 कोटी) वर पोहोचली आहे. तसेच साल 2019 मध्ये स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत सॅमसंग टॉप वर राहिली आहे.
सॅमसंगचा मार्केट शेयर सर्वात जास्त 34 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर वर शाओमी 20 टक्क्यांसह आणि वीवो तिसऱ्या नंबर वर 9 टक्क्यांसह पोहचली आहे. techARC चे फाउंडर आणि चीफ अनॅलिस्ट फैजल कउसा यांच्या मते ‘गेल्या काही वर्षांपासून फीचर फोन यूजर्स कमी प्रमाणात स्मार्टफोन कडे वळले होते. पण या वेळी स्मार्टफोन कडे जास्त ग्राहक पोहचले आहेत.
या रिपोर्ट नुसार भारतात जास्तीत जास्त यूजर्स आपला पहिला स्मार्टफोन बेसिक सेग्मेंट (5001 ते 10,000 रुपयांपर्यंत) मध्ये विकत घेण्यास पसंती देतात. 2019 मधील कंपन्यांच्या यूजर बेस बद्दल बोलायचे तर रियलमीच्या यूजर बेस मध्ये 49 टक्के, वीवोच्या यूजर बेस मध्ये 44 टक्के आणि वनप्लसच्या यूजर बेस मध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.














