काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि आईटेल आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे, जो आता भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हॉंगकॉंग आधारित ट्रांसशन होल्डिंग अधिकृत ब्रँड आईटेलने itel Vision 1 सादर केला आहे जो लुकच्या बाबतीत Apple iPhone 11 सारखा दिसतो.
डिजाइन
स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मागे असलेला फोनचा कॅमेरा मॉड्यूल अगदी iPhone 11 सारखा आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. आईटेलच्या या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तर बाजूला एक फ्लॅश लाईट पण आहे.
किंमत व ऑफर्स
फोन सोबत आईटेलचा ब्लूटूथ ईयरफोन फ्री मिळत आहे, ज्याची किंमत 799 रुपये आहे. Vision 1 कंपनीने 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. या फोन सोबत कंपनी रिलायंस जियो कडून 2200 रुपये आणि 25GB डेटा फ्री देत आहे.
स्पेसिफिकेशन्स
या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.088-इंचाचा HD + IPS वॉटरड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे जी 500 nits ब्राइटर स्क्रीन (19:5:9 आस्पेक्ट रेशियो) आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर डिवाइस 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येतो, ज्यात चिपसेट SC9863A देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 8MP + 0.08MP चा डुअल कॅमेरा फ्लॅश लाइट सह देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 5MP कॅमेरा ब्यूटी मोड सह देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
हा एक डुअल सिम फोन आहे जो 4G वोएलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन इंग्लिश व हिंदी सोबत सह इतर भारतीय भाषांमध्ये वापरता येतो. फोन एंडरॉयड 9.0 पाई वर चालतो आणि हा फोन ग्रेडेशन ब्लू आणि ग्रॅजुएशन पर्पल कलर ऑप्शन मध्ये येतो.















