Realme चा षटकार, लॉन्च झाला बजेट मधील सर्वात दमदार फोन Realme 6 Pro

साल 2020 सुरु होण्याआधी Realme 6 सीरीज संबंधित लीक्स येण्यास सुरवात झाली होती. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स आणि सर्टिफिकेशन्स साइट नंतर हि सीरीज आज बाजारात आली आहे. रियलमीने आज इंडियन मार्केट मध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स आणले आहेत. कंपनीने Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. हा फोन सर्वात आधी भारतात लॉन्च झाला आहे जो लो बजेट मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देतो. डुअल पंच होल, स्नॅपड्रॅगॉन 720 आणि क्वॉड कॅमेरा सारखे फीचर्स Realme 6 Pro ला बजेट मधील बेस्ट फोन बनवतात. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत

आर्कषक डिजाईन

Realme 6 Pro कंपनीने आकर्षक लुक व डिजाईन वर बनवण्यात आला आहे. हा रियलमी ब्रँडचा दुसरा असा स्मार्टफोन आहे जो डुअल पंच-होलला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी नॅरो बेजल्स सह येते. डिस्प्लेच्या डावीकडे दोन पंच-होल देण्यात आले आहेत ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी 6 प्रो चा बॅक पॅनल पाहता हा लाइटिंग ग्रेडिएंट टेक्नॉलॉजी वर बनवण्यात आला आहे त्यावरील लेयरिंग आणि टेक्चर या फोनला आर्कषक लुक देतात.

फोनचा रियर पॅनल सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने यावर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण दिले आहे. रियलमी 6 प्रो च्या बॅक पॅनल वर उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. तसेच फोनच्या साईड पॅनल्स वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण सोबत फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. Realme 6 Pro च्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. विशेष म्हणजे हा फोन वॉटरप्रूफ डिजाईन सह येतो.

शानदार डिस्प्ले

Realme 6 Pro कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. रियलमीचा हा फोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते ज्याला कंपनीने अल्ट्रा स्मूद डिस्प्लेचे नाव दिले आहे. Realme 6 Pro चा डिस्प्ले 480निट्स ब्राइटनेस वर चालतो तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटच्या तुलनेत हा 50 टक्के जास्त चांगली विजुअल क्वॉलिटी देतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी या फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे.

पावरफुल कॅमेरा

Realme 6 Pro कंपनीने 6 कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 4 सेंसर देण्यात आले आहेत तर फ्रंट पॅनल वर 2 सेंसर आहेत. रियर कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर इथे एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Samsung GW1 सेंसर देण्यात आला आहे. हा एक वाइड अँगल कॅमेरा आहे. सोबतच फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.5 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस पण आहे. त्याचप्रमाणे Realme 6 Pro च्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर इथल्या डुअल पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेली 16 मेगापिक्सलची Sony IMX 471 वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे.

दमदार प्रोसेसिंग

Realme 6 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई वर चालतो. हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर बनला आहे जो 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे Realme 6 Pro जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह लॉन्च झाला आहे. ग्राफिक्ससाठी रियलमी 6 प्रो मध्ये एड्रेनो 618 जीपीयू देण्यात आला आहे तर हा स्मार्टफोन 5व्या जेनरेशनच्या क्वॉलकॉम एआई इंजन सह स्मूद परफॉर्मंस देऊ शकतो.

रॅम व स्टोरेज

Realme 6 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्या सोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Realme 6 Pro च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. फोनच्या तीनही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. रियलमी ने आपला फोन LPDDR4x रॅम आणि UFS 2.1 स्टोरेज सह बाजारात आणला आहे.

मोठा पावर बॅकअप

Realme 6 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नॉलॉजी सह येते. बॅटरी यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो. कंपनीनुसार रियलमी 6 प्रो ची बॅटरी 30 मिनिटांत 70 टक्के पर्यंत चार्ज करता येईल तसेच 60 मिनिटांत फोन फुल चार्ज होईल.

किंमत व विक्री

Realme 6 Pro ची किंमत पाहता फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच रियलमी 6 प्रो चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन येत्या 13 मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल तसेच हा कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट वरून ओरेंज आणि ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here