पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच

Decathlon electric cycle launch price range sale photos

Decathlon Electric Cycle: महागड्या पेट्रोलच्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) च्या मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आता लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँड Decathlon नं आपली इलेक्ट्रिक सायकल बाजारात सादर केली आहे. डेकाथलॉननं युरोपमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे, जिला Decathlon Elops LD500E e-bicycle असं नाव देण्यात आलं आहे. ही ई-बाइक सध्या युरोपात फ्रांस आणि जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. भारतात ही सायकल कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. पुढे आम्ही तुम्हाला या ई-सायकलच्या किंमत, रेंज आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

Decathlon Elops LD500E electric bicycle

Decathlon Elops LD500E electric bicycle ची फ्रेम 6061 अ‍ॅल्युमीनियमपासून बनवण्यात आली आहे आणि हिचे वजन 23 किलो आहे. या सायकलच्या हँडलबारवर एक एलसीडी डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्यात बॅटरी चार्ज लेव्हल दाखवली जाते. तसेच डिस्प्लेचा वापर तीन पावर लेव्हल किंवा वॉक असिस्टंट मोड पैकी एक निवडण्यासाठी करता येईल. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत

Decathlon electric cycle launch price range sale photos

Decathlon electric bicycle चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

इलेक्ट्रिक बाइकची 504 Wh बॅटरी 115 किमी (71 माइल्स) पर्यंतची सिंगल चार्ज रेंज देऊ शकते आणि ही जवळपास 7 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. यात 1×8 स्पीड ट्रांसमिशन आणि बॉटम ब्रॅकेटमध्ये एका टॉर्क सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे, 250 वॉट मोटर 45 एनएम पर्यंत पावर मिळते.

Decathlon electric cycle launch price range sale photos

तसेच यात एक यूएसबी कनेक्टर मिळतो जो तुम्हाला सायकलवर असताना गॅजेट चार्ज करण्यास मदत करतो. BLUELINE AXA TEKTRO TKD32 हाइड्रोलिक डिस्क ब्रेकमुळे कमी अंतरावर सायकल थांबवता येते. या सायकलच्या टायर्सवर लाइट्स आणि रिफ्लेक्टर स्ट्रिप्स देखील आहेत त्यामुळे हिची व्हिजिबलीटी वाढते. अपघात टाळता यावे म्हणून कंपनीनं हे फीचर्स जोडले आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त iQOO Neo7 ची लाँच डेट समजली; MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह मिळेल 120W चार्जिंग

प्राइस

डेकाथलॉन एलोप्स LD500E ई-बाइकची किंमत 1,649 यूरो (जवळपास 1,32,851 रुपये) आहे. कंपनीच्या मते ही 1.55 ते 1.74 मीटर उंच रायडर्ससाठी, एक लो फ्रेम मॉडेल ग्रे-ग्रीन रंगात S ते M पर्यंतच्या आकारात सादर करण्यात आली आहे. तसेच 1.65 ते 1.95 मीटर उंचीच्या रायडर्ससाठी, M आकारमध्ये एन्थ्रेसाइट ग्रे कलर मध्ये एक हाय-फ्रेम व्हेरिएंट उपलब्ध आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here