Exclusive: 5000 mAh बॅटरी असलेला Vivo Y30, जून मध्ये होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या या फोन बाबत मध्ये सर्वकाही

लॉकडाउनमुळे सर्व कंपन्यांची फोन लॉन्च सिस्टम खराब झाली आहे. मार्च मधेच Vivo V19 भारतात लॉन्च होणार होता पण मे मध्ये हा सादर केला गेला. परंतु आता अनेक फोन लाइनअप मध्ये आहेत. पुढल्या महिन्यात सुरवातीला वीवो अपने Y सीरीज मध्ये नवीन फोन येणार आहे. 91मोबाईल्स कडे या फोन बद्दल एक्सिक्लूसिव माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार Vivo पुढल्या महिन्याच्या सुरवातीला आपला Vivo Y30 मॉडेल भारतात लॉन्च करू शकते. अलीकडेच हा फोन कंपनीने मलेशिया मध्ये सादर केला होता.

फोनच्या लॉन्चची तयारी कंपनीने केली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून याचे प्रमोशन पण शुरू होऊ शकते. आम्हाला हि माहिती वीवोच्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. हा फोन ऑनलाइन उपलब्ध होईल पण मिड रेंजचा हा फोन खासकरून ऑफलाइन स्टोर्स लक्षात ठेऊन सादर केला जाईल. फोन मध्ये मोठ्या स्क्रीन सह तुम्हाला मोठी बॅटरी मिळू शकते.

Vivo Y30 चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे वीवो वाय30 काही दिवसांपूर्वी मलेशिया मध्ये लॉन्च झाला आणि हा फोन कंपनी भारतात घेऊन येणार आहे. फोन मध्ये पंच होल डिस्प्ले सह 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.47 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला एचडी+ डिस्प्ले मिळेल.

हा फोन एंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यात तुम्हाला वीवो चा फन टच ओएस मिळेल. Vivo Y30 मीडियाटेक हेलिया पी35 चिपपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 2.3गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये तुम्हाला मेमरी कार्ड सपोर्ट पण मिळेल.

कॅमेरा सेग्मेंट पाहता इथे पण तुमची निराशा होणार नाही. कंपनीने हा क्वाड कॅमेरा सेटअप सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 13 + 8 + 2 + 2 एमपी चा कॅमेरा सेंसर मिळेल. फोनचा मुख्य सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी कंपनीने यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर वायफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. सिक्योरिटीसाठी मागच्या पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉक पण तुम्हाला मिळेल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीने हा 5,000 एमएएच च्या मोठी बॅटरी सह सादर केला आहे. फास्ट चार्जिंग नाही. भारतीय बाजारात हा फोन 15,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here