600 रुपयांमध्ये मिळत आहे 300GB डेटा, सोबतच 5 मिनिटांच्या कॉल वर 6 पैसे कॅशबॅक

देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL आपल्या यूजर्सना नेटवर्कशी जोडून ठेवण्यासाठी स्वस्तात जास्त बेनिफिट असलेले प्लान्स घेऊन येत असते. भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ने आपल्या सर्विस आणि स्वस्त प्लान्सच्या जोरावर खाजगी कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न गेले काही महिने करत आहे. ग्राहकांना असाच अजून आनंद देत BSNL ने आपल्या लोकप्रिय ‘5 pe 6’ ऑफरची वैधता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे.

जास्तीत जास्त लोकांना आपल्या नेटवर्कवर आणण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी सर्व टेलीकॉम कंपन्या काही ना काही आर्कषक ऑफर्स घेऊन येत असतात. आणि याच प्रयत्नात BSNL ने ‘5 pe 6’ ऑफरची सुरवात केली होती, ज्यात बीएसएनएल ग्राहकांना कॉलच्या बदल्यात 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. हि शानदार ऑफर कंपनीने आधीच सादर केली आहे पण आता ग्राहकांची गरज पाहता कंपनीने ऑफरची वैधता वाढवून शेवटची तारीख 31 ऑगस्ट केली आहे.

अशी आहे ऑफर

BSNL च्या ‘5 pe 6’ ऑफर मध्ये ग्राहकांना आउटगोइंग कॉल वर पैसे मिळतात. दर 5 मिनिटांचा कॉल पूर्ण झाल्यावर यूजरला 6 पैश्यांचा कॅशबॅक दिला जातो. जितका वेळ यूजर 5 मिनिट्स बोलतो तितक्या वेळा 6 पैसे कॅशबॅक मिळतो. म्हणजे जेवढा वेळ कॉल चालेल तेवढा जास्त कॅशबॅक. हा कॅशबॅक फक्त आउटगोइंग कॉल करणाऱ्यांना दिला जातो. या ऑफर अंतर्गत एक यूजर एका महिन्यात एका कनेक्शन वर जास्ती जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक मिळवूं शकतो.

अश्याप्रकारे घ्या लाभ

बीएसएनएल ने आपली हि ऑफर ब्रॉडबॅंड, लँडलाईन आणि फाइबर-टू-द-होम म्हणजे FTTH कनेक्शन वर उपलब्ध केली आहे. जर तुम्ही पण BSNL यूजर असाल आणि तुम्ही अजूनही या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर बीएसएनएल ग्राहक आपल्या कनेक्शन वरून टोल फ्री नंबर 18005991900 वर कॉल करू शकतात. तसेच ‘5 pe 6’ कॅशबॅक ऑफरसाठी 9478053334 वर ‘ACT’ नंतर स्पेस सह आपला फोन नंबर लिहून एसएमएस पाठवावा लागेल. लक्षात असू दे कि फोन नंबर सह एसटीडी कोड लिहिणे अनिवार्य आहे. अश्याप्रकारे स्कीमचा लाभ घेता येईल.

600 रुपयांच्या ब्रॉडबॅंड प्लानची वैधता पण वाढली

BSNL ने आपल्या यूजर्ससाठी प्रोमोशनल प्लानच्या रूपात 600 रुपयांचा एक ब्रॉडबॅंड प्लान सादर केला होता जो 27 जुलै पर्यंत वैध होता. पण आता कंपनीने ग्राहकांसाठी या प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएल यूजर आता येत्या 27 अक्टूबर पर्यंत या प्लानचा रिचार्ज करू शकतील. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता 600 रुपयांमध्ये यूजर्सना एकूण 300GB डेटा दिला जात आहे जो 40Mbps च्या स्पीडने वापरता येतो. 300जीबी संपल्यावर ग्राहक 2Mbps स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. त्याचबरोबर प्लान मध्ये अनलिमिटेड नॅशनल वॉयस कॉलिंग पण फ्री मिळत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here