Google Pixel 4a फोन येणार आहे, हि चर्चा अनेक दिवस चालू होती. जेव्हापासून समजले आहे कि गूगल आपला हा पिक्सल फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये नव्हे तर मिड बजेट मध्ये सादर करेल, तेव्हापासून भारतीय फॅन्स पण या फोनची वाट बघत आहेत. स्मार्टफोन्स यूजर्सची प्रतीक्षा संपवत गूगलने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन सादर केला आहे. Google Pixel 4a अधिकृतपणे टेक मंचावर सादर केला आहे. फक्त पिक्सल 4ए नाही तर त्या सोबत कंपनीने Google Pixel 4a 5G आणि Google Pixel 5 ची पण घोषणा केली आहे.
किंमत व विक्री
सर्वात आधी Google Pixel 4a ची किंमत पाहता हा फोन $349 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,300 रुपयांच्या आसपास आहे. गूगल पिक्सल 4ए सध्या अमेरिकन बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे तर फोनची विक्री 20 ऑगस्ट पासून सुरु होईल. तसेच भारतात फोनची लॉन्च डेट सध्या समोर आली नाही पण फोनची विक्री भारतात ऑक्टोबर मध्ये होईल. येत्या काही दिवसांत हा फोन भारतात पण प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
Google Pixel 4a
गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.
Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
गूगल पिक्सल 4ए वीडियो













