5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह OPPO A53 भारतात झाला लॉन्च, बेस किंमत 12,990 रुपये

OPPO A53 चा 4G व्हेरिएंट

OPPO ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि याअंतर्गत OPPO F17 आणि OPPO F17 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. ओपो एफ17 सीरीजची लॉन्च डेट अजूनतरी समोर आली नाही पण त्याआधी कंपनीने काल आपल्या ‘ए सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO A53 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 12,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होतील.

लुक व डिजाईन

OPPO A53 कंपनीने बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो स्क्रीनच्या वर डावीकडे आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. यात कॅमेरा सेंसर्स वर्टिकल आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आणि लेंसची माहिती लिहिलेली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे. लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पीकर आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO A53 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. ओपो ए53 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर OPPO A53 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर फोन मध्ये आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए53 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A53 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

OPPO A53 भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,990 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 15,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो ए53 Electric Black, Fairy White आणि Fancy Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here