जर तुम्ही पण वापरता असाल हे 21 ऍप्स तर त्वरित करा डिलीट, इथे बघा संपूर्ण लिस्ट

जर तुम्ही पण गेमिंगचे चाहते असाल आणि फ्री गेमिंगच्या नादात काही असे गेमिंग ऍप डाउनलोड करत असाल तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. गुगल प्ले स्टोर वर मालवेयरने संक्रमित 21 अँड्रॉइड ऍप्स स्पॉट केले आहेत म्हणून आम्ही असे बोलत आहोत. या ऍप्सची माहिती चेक अँटीवायरस निर्माता अवास्टने दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार हे ऍप्स जवळपास ऐंशी लाख वेळा डाउनलोड केले गेले आहेत. सिक्योरिटी फर्मचा दावा आहे कि प्रभावित ऍप मध्ये ऍडवेयर आहे, ज्याला हिडअड्स म्हणतात, जो स्वतःला मजेदार किंवा उपयोगी ऍप्लिकेशन मध्ये रूपांतरित करतो, पण मुळात ऍप तुम्हाला जाहिरात बघण्यास भाग पडतो.

इथे बघा लिस्ट

  • Shoot Them
  • Crush Car
  • Rolling Scroll
  • Helicopter Attack – New
  • Assasin Legend – 2020 New
  • Helicopter Shoot
  • Rugby Pass
  • Flying Skateboard
  • Iron it
  • Shooting Run
  • Plant Monster
  • Find Hidden
  • Rotate Shape
  • Jump Jump
  • Sway Man
  • Dessert Against
  • Cream Trip – New
  • Props Rescue

हि बातमी लिहताना 21 संक्रमित ऍप्स पैकी दोन अजूनही Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. ऍप्सचे नाव फाइंड 5 डिफरेंसेस – 2020 न्यू आणि फाइंड डिफरेंस, जे पझल गेम आहेत. अवास्ट मालवेयर अनॅलिस्ट जकूब वावराने म्हटले आहे कि ऍडवेयरचे डेवलपर्स सोशल मीडियाचा वेगाने वापर करत आहेत. वर सांगितलेले ऍप्लिकेशन, लोकप्रिय गेम्सची नक्कल करतात.

हे देखील वाचा : डेटा चोरी करत आहेत हे 17 खतरनाक मोबाईल ऍप्स, त्वरित करा डिलीट

हे ऍप असतात तर फ्री पण यांची कमाई ऍडवरटाइजिंग मधून येते. त्यामुळे हे डाउनलोड केल्या गेलेल्या डिवाइसचा वापर स्वतःची कमाई मिळवण्यासाठी करतात. या ऍप्स बद्दल युजर्सना सतर्क करण्यात आले आहे. जर तुमच्या फोन मध्ये वर देण्यात आलेल्या लिस्ट पैकी कोणताही ऍप असेल तो लगेच काढून टाका.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here