Motorola Edge 50 Neo चा फोटो साईटवर आला समोर, लवकर होऊ शकतो लाँच

मोटोरोलाच्या एज 50 सीरीजमध्ये आतापर्यंत 4 मॉडेल लाँच झाले आहेत. तसेच, आता पाचवा व्हेरिएंट Motorola Edge 50 Neo नावाने लाँच होण्याची शक्यता आहे. याला घेऊन पूर्व मध्ये पण लीक समोर आले आहेत. तसेच, बाजारात येण्याच्या आधी डिव्हाईस MIIT सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले आहे. ज्यात फोटो आणि काही प्रमुख माहिती मिळाली आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

Motorola Edge 50 Neo फोटो (लिस्टिंग)

  • मोटोरोला एज 50 नियो MIIT सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आले आहे यात डिव्हाईस पॅनटोन लैटे कलरमध्ये दिसला आहे.
  • फोनमध्ये रिअर पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह चौकोर कॅमेरा मॉड्यूल दिसतो.
  • मोबाईलमध्ये समोरच्या बाजूला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल कटआऊटचा समावेश आहे. तर वॉल्यूम आणि पावर बटन उजव्या बाजूला देण्यात आले आहे.
  • MIIT डेटाबेसवर आल्याने असे वाटत आहे की डिव्हाईस लवकरच चीनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • आशा आहे की येत्या काही दिवसांमध्ये ब्रँड आगामी Motorola Edge 50 Neo बाबत कोणतीही घोषणा करू शकते.

Motorola Edge 50 Neo चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: पूर्व लीकनुसार Motorola Edge 50 Neo फोनमध्ये 6.4-इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा पॅनल pOLED असण्याची शक्यता आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: मोटोरोला ऐज 50 नियो स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह येऊ शकतो. हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर प्रोसेसवर आधारित आहे. यात 2.5GHz पर्यंत क्लॉक स्पीड मिळते.
  • स्टोरेज: फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +256 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सल मेन कॅमेरा सेन्सर, 13 मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि 10 मेगापिक्सलचा ​इतर सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Motorola Edge 50 Neo 32MP लेन्स असू शकते.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी मोटोरोला ऐज 50 नियो 5जी मध्ये 4,310mAh ची बॅटरी मिळणार असल्याची संभावना आहे.
  • इतर: डिव्हाईसमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग दिली जाऊ शकते. हा अँड्रॉईड 14 वर रन करू शकतो. तसेच, मोबाईलचे डायमेंशन 71.2×154.1×8.1 एमएम आणि वजन 171 ग्रॅम सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here