नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी HMD Global लवकरच दोन क्लासिक स्मार्टफोन्स नवीन अवतारात लॉन्च करू शकते. अलीकडेच याची माहिती समोर आली होती कि कंपनी जुन्या काळातील दोन दमदार मोबाईल फोन्स- Nokia 6300 आणि Nokia 8000 लॉन्च करण्याच्या तयारीत. आशा आहे कि कंपनी हे दोन्ही फोन्स 4G सपोर्ट आणि आजच्या नवीन फीचर्स सह लॉन्च करू शकते. तसेच आता नोकिया 8000 4G बद्दल माहिती समोर आली आहे. नोकिया 8000 4G फोनची डिजाइन लीक पोस्टरच्या माध्यमातून ऑनलाइन लीक झाली आहे, ज्यात रीव्हॅम्प फीचर फोनचा पहिला कथित फोटो समोर आला आहे. लीकनुसार, या फोन मध्ये ओरिजनल Nokia 8000 सीरीजची स्लाइडर डिजाइन असणार नाही.
WinFuture च्या रिपोर्ट मध्ये Nokia 8000 4G चा पोस्टर शेअर केला गेला आहे. पोस्टर मध्ये फोन वळणदार कडांसह सह स्पॉट केला गेला आहे, ज्यात 3डी कर्व्ड डिजाइनचे बटन पण आहे. पोस्टर मध्ये सांगण्यात आले आहे कि Nokia 8000 4G फोन मध्ये ‘प्रीमियम ग्लास-लाइक डिजाइन’ असेल. डिजाइनच नाही तर पोस्टर शेअर करणाऱ्या रिपोर्ट मध्ये फोनच्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती पण समोर आली आहे. यावरून संकेत मिळाले आहेत कि हे लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : Nokia च्या फोन मध्ये झाला ब्लास्ट, तुम्ही मात्र हि मोठी चूक करू नका
रिपोर्ट मध्ये डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स सोबतच माहिती देण्यात आली आहे कि या फीचर फोन मध्ये WhatsApp आणि Facebook प्रीलोडेड येतील. तसेच असे पण सांगण्यात आले आहे कि नोकिया 8000 फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी आणि वाय-फाई हॉटस्पॉट असेल. पोस्टर मध्ये डिवाइस सध्या ब्लॅक कलर वेरिएंट सह स्पॉट केला गेला आहे.
हे देखील वाचा : दमदार Nokia 8 V 5G UW स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत
Nokia 8000 4G चे स्पेसिफिकेशन्स
रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि नोकिया 8000 4जी फोन KaiOS वर चालेल आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 201 प्रोसेसर सह येईल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये 2.8-इंचाची एलसीडी स्क्रीन पण दिली जाईल, ज्याचे रिजॉल्यूशन 320×240 पिक्सल असेल. सोबतच फोन मध्ये 512एमबी रॅम आणि 4जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 128 जीबी पर्यंत वाढवता येईल. या फीचर फोन मध्ये 1,500 एमएएचची बॅटरी आणि डुअल-सिम सपोर्ट दिला जाईल. फोटोग्राफीसाठी यात एक 2 मेगापिक्सलचा कॅमेरा पण असेल.














