HMD Global ने आपला प्रीमियम हँडसेट पोर्टफोलियो वाढवत Nokia 8 V 5G UW लॉन्च केला आहे. हा नवीन फोन कंपनीने अमेरिकेच्या मार्केट मध्ये सादर केला आहे, ज्यासाठी लोकल टेलिकॉम कंपनी वेरिजॉन सह पार्टनरशिप करण्यात आली आहे. फोन वेरिजॉनच्या mmWave 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. हा हँडसेट 6.81-इंचाच्या FHD + डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 765G SoC, 128GB स्टोरेज, 64MP क्वाड-कॅमेरा आणि 18W फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येतो.
Nokia 8 V 5G UW चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 8 V 5G UW मध्ये 6.81-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 X 2,400 आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो आहे. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G SoC सह एड्रिनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम सह 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. नोकियाच्या या फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
हे देखील वाचा : Nokia च्या फोन मध्ये झाला ब्लास्ट, तुम्ही मात्र हि मोठी चूक करू नका
बॅटरी
नोकिया 8 V 5G 4500mAh बॅटरी सह येतो. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी आणि ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोन मध्ये बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.
फोटोग्राफी
नोकियाच्या या स्मार्टफोन मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी, 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-लेंस, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्स मॅक्रो लेंस आहे. हँडसेट मध्ये फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 24 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
हे देखील वाचा : नवीन अवतारात येत आहे Nokia 6300 आणि नोकिया 8000, पुन्हा येतील जुने दिवस
किंमत
Nokia 8 V 5G UW ची किंमत $ 699 (जवळपास 51,700 रुपये) पासून सुरु होते आणि हा Verizon आणि Best Buy मध्ये 12 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी येईल. फोन कंपनीने कॉमेट ग्रे रंगात सादर केला आहे. भारतात या डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.














