सर्वात स्वस्त 5G चिपसेट वर लाॅन्च झाला हा शानदार स्मार्टफोन, बघा कोणी केली ही कमाल

VIVO बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y31 लाॅन्च करणार आहे. या फोनचा प्रोमोशनल पोस्टर पण इंटरनेट वर लीक झाला आहे. पण वीवो वाय31 भारतात येण्याआधी कंपनीने एक नवीन स्मार्टफोन Vivo Y31s टेक मार्केट मध्ये आणला आहे. वीवो वाय31एस सध्या चीनी बाजारात लाॅन्च केला गेला आहे जो येत्या काळात जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Vivo Y31s जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो सर्वात स्वस्त 5G चिपसेट क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगनला सपोर्ट करतो.

Vivo Y31s

वीवो वाय31एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले वर लाॅन्च झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चीन पार्ट देण्यात आला आहे. वीवोने आपला हा फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी स्क्रीन वर लाॅन्च केला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. डिस्प्ले प्रोटेक्शनची माहिती मात्र मिळाली नाही.

Vivo Y31s ची सर्वात मोठी खासियत या फोन मधील चिपसेट आहे. काही दिवसांपूर्वी क्वाॅलकाॅमने आपल्या नव्या 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगन 480 ची घोषणा केली होती जो खासकरून त्या स्मार्टफोन्ससाठी बनवण्यात आला होता जे कमी किंमतीत 5G कनेक्टिविटी देऊ पाहत आहेत. वीवो वाय31एस या चिपसेटसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्याचबरोबर हा फोन एंडराॅयड लेटेस्ट ओएस एंडराॅयड 11 आणि फनटच ओएस 10.5 सह काम करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय31एस डुअल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वर असलेल्या वाॅटरड्राॅप नाॅच मध्ये आहे.

Vivo Y31s एक डुअल सिम फोन आहे जो 5जी सह 4जी एलटीईला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट व किंमत

Vivo Y31s दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 1498 युआन आणि 6 जीबी वेरिएंट 1698 युआन मध्ये लाॅन्च झाला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार क्रमशः 16,900 रुपये आणि 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here