अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क

Adani Group टेलिकॉम इंडस्ट्रीमधील नवा खेळाडू आहे, जे यंदा इंटरप्राइज स्तरावर 5G सर्व्हिस देण्याची योजना बनवत आहेत. नवीन वर्षानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ग्रुपचे संस्थापक आणि चेयरमन गौतम अदानी यांनी आपली योजना सांगितली, त्यानुसार ते डेटा सेंटर्स वाढवण्यासाठी, एआय-एमएल आणि इंडस्ट्री क्लाऊड क्षमता विकसित करण्यासाठी, बी2सी अ‍ॅप्स बाजारात आणण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

Adani 5G सर्व्हिस

कंपनीनं 2022 मध्ये झालेल्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात 212 कोटींची बोली लावली आहे, ज्यात त्यांनी फक्त 400 MHz स्पेक्ट्रमची खरेदी केली आहे. त्यामुळे अदानी सामान्य ग्राहकांना 5G देऊ शकणार नाही कारण कंपनीनं सर्व 5G बँड्समध्ये स्पेक्ट्रमची खरेदी केली नाही. आता अदानी स्वतःच्या आणि इतर व्यवसायांना खाजगी नेटवर्क देण्याची तयारी करत आहे, अशी माहितीतही द हिंदू बिजिनेसलाइननं दिली आहे. हे देखील वाचा: बंद होणार 630GB 5G डेटा असलेला प्लॅन! Jio युजर्स लवकर करा ‘हा’ रिचार्ज

परंतु भारतातील पहिली खाजगी 5जी प्रायव्हेट नेटवर्कची डील गेल्याच वर्षी भारती एयरटेल आणि महिंद्रा ग्रुपमध्ये झाली आहे. तसेच Reliance Jio नं देखील सांगितलं आहे की कंपनी देखील महसूल मिळवण्यासाठी खाजगी 5जी नेटवर्कचा वापर करेल. तसेच आयटीमधील मोठी कंपनी टीसीएस देखील या शर्यतीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

भारतातील 5जी नेटवर्क

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी अधिकृतपणे देशातील 5G services ला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर लगेचच एयरटेलनं देशात आपल्या 5जी सर्व्हिस लाइव्ह केल्याची घोषणा केली. काही दिवसांनी जियोनं देखील नव्या जेनरेशनचं नेटवर्क देशात सादर केलं परंतु वोडाफोन-आयडियाची 5जी सर्व्हिस मात्र अद्याप सुरु झालेली नाही. एयरटेलनं नॉन स्टॅन्ड अलोन (NSA) टेक्नॉलॉजीचा सर्वप्रथम व्यावसायिक वापर केला आहे. तर दुसरीकडे जियो ही एकमेव कंपनी आहे जी 700 MHz बँड आणि 5जी स्टॅन्ड अलोन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

BSNL 5G Service

BSNL 5G Service च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5जी सर्विस (5G Service) 2024 मध्ये सुरु केली जाईल. ही माहिती खुद्द केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Telecom Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात 5G सुरु करण्याची माहिती देण्यासह त्यांनी सांगितलं की BSNL 4G Network सुरु करण्यासाठी टीसीएस (TCS) आणि सी-डॉट (C-DOT) यांच्या संघाची निवड करण्यात आली आहे, यातील करारानुसार आदेश दिल्यानंतर वर्षभरात सरकारी टेल्कोचा नेटवर्क 5जीवर अपग्रेड करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here