Reliance Jio चे मालक Akash Mukesh Ambani यांनी अलीकडेच न्यू ईयर ऑफर लाँच केली होती. ही जियोची खास ऑफर आहे जी खास एक्स्ट्रा बेनिफिट्ससह युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. या New Year सेलिब्रेशन ऑफर अंतगर्त तुम्हाला तुमचा पुढील रिचार्ज थेट पुढील वर्षी 2024 मध्ये करावा लागेल. परंतु नेहमीप्रमाणे ही ऑफर देखील मर्यादित कालावधीसाठी सादर करण्यात आली आहे. जर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ की या प्लॅननं तुमचा Jio Number लवकरात लवकर रिचार्ज करा कारण लवकरच कंपनी ही ऑफर बंद करणार आहे.
कधी बंद होणार न्यू ईयर ऑफर
जियो अनेक वर्षांपासून नवीन वर्षाच्या निमित्ताने न्यू ईयर ऑफर अंतगर्त या प्रकारचा प्लॅन सादर करते, जो मर्यादित कालावधीसाठी सादर केला जातो. परंतु अद्याप कंपनीनं स्पष्ट सांगितलं नाही की हा प्लॅन कधीपर्यंत पर्यंत लाइव्ह राहील. यासाठी आम्ही तुम्हाला सल्ला देऊ की या रिचार्ज प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरच रिचार्ज करावा लागेल.
का खास आहे 2023 न्यू ईयर ऑफर
हा प्लॅन खास असण्यामागे कारण म्हणजे यात सर्व ग्राहकांना 5G डेटा दिला जात आहे. सध्या वेगानं भारतभर पसरत असलेल्या कंपनीच्या 5G नेटवर्कवर युजर्सना अपग्रेड करायला लावण्यासाठी जियोनं ही शक्कल लढवली आहे. त्याचबरोबर फ्री कॉलिंग आणि अनेक अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन ऑफर केलं जात आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया…
Jio 2023 Plan Details
जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. त्या हिशोबाने एकूण वैधतेसाठी कंपनी युजर्सना एकूण 630 जीबी डेटा वापरण्यासाठी देत आहे. तसेच या प्लनंदाचे युजर्सना कोणत्याही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळत आहे. यामुळे ग्राहक ऑन आणि ऑफ नेटवर्क अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच लोकल आणि एसटीडी नंबर्सवर एसएमएस पाठवण्यासाठी डेली 100 एसएमएस मोफत मिळतील.
जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनची वैधता 252 दिवस आहे म्हणजे हा एक लॉन्ग टर्म रिचार्ज प्लॅन आहे – रिलायन्स जियो युजर्सना कंपनीकडून मिळणारा अतिरिक्त फायदा म्हणजे Jio Apps चा अॅक्सेस. कंपनीच्या नवीन 2023 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील जियोकडून JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.