Reliance Jio 129 रुपये, Airtel 148 रुपये कि Vodafone 149, जाणून घ्या कोणत्या नेटवर्क वर मिळेल 28 दिवसांसाठी सर्वात जास्त फायदा

1 डिसेंबरला डेसातील टेलीकॉम कंपनी Airtel आणि Vodafone Idea ने आपल्या नवीन प्लान्सची घोषणा केली होती. हे प्लान्स समोर येताच स्पष्ट झाले होते कि आता स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगचे दिवस संपले आहेत. या दोन मोठ्या कंपन्यांच्या प्लान समोर आल्यानंतर Reliance Jio च्या प्लान्सची वाट बघितली जात होती. Reliance Jio ती कंपनी आहे जिने भारतीय दूरसंचार बाजाराचा चेहरा बदलला होता. Jio ने घोषणा केली होती कि तिचे प्लान इतर टेलीकॉम कंपन्यांच्या तुलनेत 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त असतील आणि आता Reliance Jio ने आपले प्लान्स सादर करून हे स्पष्ट केले आहे.

Reliance Jio ने काल रात्री आपले सर्व नवीन All-in-One प्लान सादर केले आहेत. कंपनीने प्रत्येक बजेट मध्ये प्लान सादर केले आहेत. ज्यांचा वापर एका महिन्यापासून एक वर्षाच्या वॅलिडिटी पर्यंत केला जाऊ शकतो. या लेखात आम्ही Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या प्लान्सचा तुलनात्मक अभ्यास केला आहे ज्यांची किंमत 125 ते 150 रुपयांच्या आत आहे. जर तुम्ही पण या किंमतीत एखादा रिचार्ज करू इच्छित असाल तर पुढे दिलेली माहिती तुम्हाला प्लान्स आणि कंपनी निवडण्यास मदत करेल.

Reliance Jio

सर्वात आधी Reliance Jio बद्दल बोलायचे तर या रेंज मध्ये Jio ने 129 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा एक प्रीपेड प्लान आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये कंपनी 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे जो महिनाभर वैध राहील. म्हणजे या प्लान मध्ये यूजर्सना रोज डेटा मिळणार नाही. तसेच 129 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना संपूर्ण महिन्यासाठी एकूण 300 एसएमएस पण मिळतील.

आता वॉयस कॉलिंगबद्दल बोलायचे तर इथे पण Reliance Jio ने आपल्या सेवा कमी केल्या आहेत. 129 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी ऑन-नेटवर्क म्हणजे Jio ते Jio नंबर वर वॉयस कॉलिंग पूर्णपणे फ्री देत आहे पण इतर कंपन्यांच्या नंबर म्हणजे ऑफ-नेटवर्क कॉलिंग साठी ग्राहकांना फक्त 1000 मिनिट्स मिळतील.

Airtel

प्रदीर्घकाळ देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनीच्या स्थानी विराजमान राहिलेल्या Airtel ने आपला जुना प्लान अपडेट केला आहे . कंपनीने 1 डिसेंबरच्या आधी मासिक प्लान 128 रुपयांचा दिला होता, या प्लानची किंमत आता 148 रुपये झाली आहे. हा एक प्रीपेड प्लान आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान अंतर्गत पण Airtel यूजर्सना संपूर्ण महिन्यासाठी एकूण 2 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळेल.

Airtel 148 रुपयांमध्ये संपूर्ण महिन्यासाठी एकूण 300 एसएमएस देत आहे. तसेच वॉयस कॉलिंगसाठी Airtel आपल्या यूजर्सना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. विशेष म्हणजे Airtel ने हि कॉलिंग पूर्णपणे फ्री ठेवली आहे आणि ऑन-नेटवर्क व ऑफ-नेटवर्क म्हणजे देशातील कोणत्याही कंपनीच्या नंबर वर फ्री कॉल करता येईल. त्याचबरोबर एयरटेल एक्सट्रीम, विंक आणि हॅलो ट्यून्सचा फायदा मिळेल.

Vodafone Idea

दोन कंपन्यांच्या मर्जर नंतर Vodafone Idea भारतातील सर्वात टेलीकॉम कंपनी बनली आहे. या रेंज मध्ये Vodafone ने 149 रुपयांचा प्लान जारी केला आहे. हा पण प्रीपेड प्लान आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत मिळणारे बेनिफिट Jio च्या 129 रुपयांच्या प्लानप्रमाणे आहेत. Vodafone या प्लान मध्ये संपूर्ण महिन्यासाठी 2 जीबी 4G इंटरनेट डेटा आणि 300 एसएमएस देत आहे. तसेच ऑन-नेटवर्क अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह ऑफ-नेटवर्क कॉलिंग साठी 1000 मिनिट्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here