बघा कोणती कंपनी सर्वात कमी किंमतीत देत आहे रोज 2 जीबी 4G डेटा, Jio, Airtel कि Vodafone

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्रीच्या नव्या इनींगची सुरवात झाली आहे. Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio ने आपले नवीन प्लान्स सादर केले आहेत. Airtel आणि Vodafone Idea चे प्लान्स 3 डिसेंबर पासूनचा संपूर्ण देशात जारी झाले आहेत तर 6 डिसेंबर पासून Reliance Jio चे नवीन प्लान्स पण देशभरात लागू होतील. सर्व कंपन्यांनी आपल्या प्लान्सचे टॅरिफ रेट वाढवले आहेत आणि त्यामुळे मोबाईल यूजर्स समोर मोठी समस्या उभी राहिली आहे कि कोणती कंपनी निवडावी आणि कोणत्या नेटवर्कशी जोडले जावे. या लेखात आम्ही तिन्ही टेलीकॉम कंपन्यांच्या त्या मासिक प्लान्सची माहिती दिली आहे, ज्यात कंपनी रोज 2 जीबी 4G डेटा देत आहे. पुढील टेलीकॉम प्लान्स Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio चे सर्वात स्वस्त प्लान्स आहेत ज्यात यूजर्सना 2 जीबी 4G डेटा प्रतिदिन मिळेल.

Airtel 298 रुपये

सर्वात आधी Airtel बद्दल बोलायचे तर कंपनीचा 298 रुपयांचा प्लान या लिस्ट मध्ये येतो. हा प्लान आधी 249 रुपयांमध्ये येत होता, पण टॅरिफ अपडेट केल्यानंतर या प्लानची किंमत वाढून 298 रुपये झाली आहे. प्लानची डिटेल्स पाहता हा एक मासिक प्लान आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडेटी सह येतो. Airtel या प्लान मध्ये यूजर्सना रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे एक महिन्यासाठी एकूण 56जीबी डेटा.

Airtel च्या या 298 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना रोज 100एसएमएस मिळतील. तसेच वॉयस कॉलिंग पाहता Airtel आपल्या यूजर्सना संपूर्ण 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. कंपनीने हि कॉलिंग पूर्णपणे फ्री ठेवली आहे आणि ऑन-नेटवर्क व ऑफ-नेटवर्क म्हणजे देशातील कोणत्याही कंपनीच्या नंबर वर फ्री कॉल करता येतील.

Vodafone 299 रुपये

भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनलेल्या Vodafone Idea ने या सेग्मेंट मध्ये आपला डाव टाकत 299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान अगदी नवीन आहे जो प्रीपेड ग्राहकांसाठी बनला आहे. Vodafone चा हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो ज्यात यूजर्सना रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळेल. प्रतिदिन 2जीबी या हिशोबाने Vodafone ग्राहक संपूर्ण महिन्यात एकूण 56जीबी 4G डेटा वापरू शकतील.

इतर बेनिफिट्स पाहता Vodafone पण आपल्या यूजर्सना रोज 100 एसएमएस देत आहे. तसेच वॉयस कॉलिंग बद्दल बोलायचे तर Vodafone अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देत आहे पण हे अमर्याद कॉल फक्त Vodafone टू Vodafone फ्री असतील. जर यूजर्स Vodafone व्यतिरिक्त इतर कंपनीच्या नंबर वर कॉल करू इच्छित असतील तर त्यांना फक्त 1000 ऑन-नेटवर्क कॉलिंग मिनिट्स मिळतील.

Reliance Jio 249

या सेग्मेंट मध्ये Reliance Jio चा प्लान सर्वात स्वस्त आहे. Jio च्या या प्लानची किंमत 249 रुपये आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्रीपेड प्लान मध्ये Jio ग्राहकांना रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे Jio यूजर्स संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये एकूण 56जीबी डेटा वापरू शकतील. त्याचबरोबर 249 रुपयांच्या Jio प्लान मध्ये इतर कंपन्यांप्रमाणे रोज 100 एसएमएस मिळतील.

वॉयस कॉलिंगची बद्दल बोलायचे तर Reliance Jio यूजर्सना ऑन-नेटवर्क व ऑफ-नेटवर्क कॉलिंगचे मर्यादित बेनिफिट मिळतील. ऑन-नेटवर्क कॉलिंग पूर्णपणे फ्री असतील तर ऑफ-नेटवर्क कॉलिंगसाठी Jio ग्राहकांना कंपनी कडून 1000 वॉयस मिनिट्स दिले जात आहेत.

एकंदरीत रोज 2 जीबी डेटा हवा असणाऱ्या यूजर्सना Jio चा प्लान इतरांपेक्षा जवळपास 50 रुपये स्वस्त मिळतो. पण जर वॉयस कॉलिंगचा विषय आला तर फक्त Airtel यूजर्सच संपूर्ण देशात कोणत्याही नेटवर्कच्या नंबर वर अनलिमिटेड बोलू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here