
TRAI नं गेल्यावर्षी भारत टेलीकॉम कंपन्यांना एक असा प्लॅन सादर करण्यास सांगतील होता जो 28 दिवस नव्हे तर एक महिन्याच्या वॅलिडिटीसह येईल. त्यानुसार सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांकडे एक महिन्यांची वैधता आणि 30 दिवसांचे रिचार्ज प्लॅन आहेत. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये Airtel 30 Days Plans ची माहिती देणार आहोत. एयरटेलकडे एकूण 6 असे रिचार्ज आहेत, ज्यात युजर्सना 1 महिन्यांच्या वैधतेसह 30 दिवसांची वैधता मिळते. वेळ न दवडता जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत सर्वकाही.
Airtel 1 Month Validity Plan
- Rs 319 Airtel Recharge Plan
- Rs 359 Airtel Recharge Plan
- Rs 509 Airtel Recharge Plan
एयरटेलचा 319 रुपयांचा प्लॅन
319 रुपयांचा रिचार्ज 1 Month च्या वैधतेसह येतो. एयरटेलच्या या रिचार्जमध्ये डेली 2GB डेटा, 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच याची वैधता संपूर्ण एक महिना आहे, मग महिना 30 दिवसांचा असो किंवा 31 दिवसांचा. हे देखील वाचा: कुटुंब सांभाळून देशाचं संरक्षण करणारा पुन्हा येतोय; Family Man 3 रिलीज डेटची मनोज वाजपेयीनं दिली माहिती
एयरटेलचा 359 रुपयांचा प्लॅन
या मंथली रिचार्ज प्लॅनमध्ये 2 जीबी डेली डेटासह 1 कॅलेंडर महिन्याची वैधता मिळते. प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडीवर अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस मिळतात. तसेच अॅडिशनल बेनिफिट्स म्हणून प्लॅनमध्ये Airtel Xstream अॅपचे 28 दिवसांचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते. प्लॅनमध्ये SonyLiv, LionsgatePlay, ErosNow आणि अन्य प्लॅन Xstream चॅनेलवर अॅक्सेस करता येतील.
एयरटेलचा 509 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला एक महिन्याची वैधता मिळते. रिचार्जसह लोकल-एसटीडी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळेल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 300 SMS आणि 60GB हाय-स्पीड डेटासह Wynk Music चा अॅक्सेस फ्री दिला जात आहे. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये फ्री हेल्लो ट्यून, Apollo 24/7 Circle आणि FASTag रिचार्जवर कॅशबॅक देखील मिळते.
Airtel 30 Days Validity Plan
- Rs 199 Airtel Recharge Plan
- Rs 296 Airtel Recharge Plan
- Rs 489 Airtel Recharge Plan
एयरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 199 रुपयांचा प्लॅनमध्ये एकूण 3जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर युजर्सना 30 दिवसांची वॅलिडिटी फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री Wynk Music चा अॅक्सेस व हेल्लो ट्यूनचा फायदा दिला जात आहे.
एयरटेलचा 296 रुपयांचा प्लॅन
एयरटेलच्या 296 रुपयांच्या रिचार्जमध्ये 25GB डेटा दिला जाता आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यातील 25जीबी डेटा एकाच दिवसात वापरता येतो. म्हणजे रोज डेटा वापरण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तसेच रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग, डेली 100 SMS फ्री, Amazon Prime Video चा अॅक्सेस 30 दिवसांसाठी फ्री, Apollo 24/7 Circle चा फायदा 3 महिन्यांसाठी, अनलिमिटेड डाउनलोडसह Wynk Music चे सब्सक्रिप्शन फ्री, FAStag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक, Shaw Academy चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन फ्री आणि अनलिमिटेड चेंजसह Hellotunes फ्री मिळते. हे देखील वाचा: अबब! तब्बल दीड महिने टिकणार बॅटरी; 6 हजारांच्या बजेटमध्ये MOTO E13 भारतात लाँच
एयरटेलचा 489 रुपयांचा प्लॅन
या प्री-पेड प्लॅनमध्ये युजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जात आहे. तसेच, रिचार्जमध्ये 300 SMS आणि 50GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. अॅडिशनल बेनिफिट्स पाहता या रिचार्जमध्ये Wynk Music चा अॅक्सेस फ्री दिला जात आहे. त्याचबरोबर फ्री हेल्लो ट्यून, Apollo 24/7 Circle आणि FASTag रिचार्ज वर कॅशबॅक मिळतो.
















