6,999 रुपयांमध्ये MOTO E13 भारतात लाँच; फोनमध्ये 4GB रॅमसह 5000mAh ची बॅटरी

Highlights

  • Jio Lock Offer सह MOTO E13 ची इफेक्टिव प्राइस फक्त 4,200 रुपये होते.
  • हा स्मार्टफोन Android 13 “Go” Edition ऑपरेटिंग सिस्टमसह येतो.
  • MOTO E13 ची बॅटरी 42 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते.

मोटोरोला सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाली आहे. कंपनी फ्लॅगशिप पासून बजेट सेगमेंट पर्यंत शानदार स्मार्टफोन सादर करत आहे. आज कंपनीनं बजेट सेगमेंटमधील पोर्टफोलियो वाढवण्यासाठी MOTO E13 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फक्त 6,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे, ज्यात 13MP camera, 4GB RAM, Unisoc T606 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात.

MOTO E13 Price

मोटो ई13 स्मार्टफोनचे दोन मेमरी व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील 2 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज साठी 7,999 रुपये मोजावे लागतील. Jio Lock Offer अंतर्गत MOTO E13 मध्ये रिलायन्स जियो सिम वापरणाऱ्या ग्राहकांना 700 रुपयांचा डायरेक्ट रिफंड येईल. तसेच 40 कॅशबॅक व्हाउचर मिळतील ज्यांची एकूण व्हॅल्यू 2000 रुपये असेल. या जियो ऑफर्स नंतर या फोनचा इफेक्टिव प्राइस 4,200 रुपये होईल. हे देखील वाचा: Realme V30 आणि Realme V30t ची दणक्यात एंट्री! तुमच्या बजेटमध्ये बसतायत का पाहा

Moto E13 Specifications

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 4GB RAM + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनच्या स्क्रीनमध्ये 269पीपीआय आणि नाईट लाईट मोड सारखे फीचर्स मिळतात.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या 64बिट Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. फोनमध्ये LPDDR4x RAM टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करते येईल.

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर जहां एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 42 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते.

Moto E13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हा फोन आयपी52 रेटेड असल्यामुळे पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे. या मोटोरोला मोबाइलमध्ये मल्टी डायमेशनल डॉल्बी साउंड, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: एक महिना टिकणार का वनप्लसच्या टॅबलेटची बॅटरी? असे आहेत OnePlus Pad चे शानदार फीचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here