999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन

Bharti Airtel एयरटेलकडे पोस्टपेड युजर्ससाठी अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्स मिळतात. परंतु तुमचं जर एक छोटं कुटुंब असेल तर कंपनीच्या एकाच प्लॅनमधून सर्वांच्या गरजा पूर्ण करता येतात. एयरटेलचा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन एका छोट्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांची आरामात काळजी घेऊ शकतो. पुढे आम्ही या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Airtel चा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमधील फायदे

एयरटेलचा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅटिनम प्लॅन तीन-चार लोकांच्या कुटुंबासाठी एक चांगला प्लॅन ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 100 GB डेटा बेनिफिट दिला जातो, तसेच महिनाभरात न वापरलेल्या 200 GB पर्यंतचा डेटा पुढील महिन्यात Data rollover च्या मदतीनं वापरता येतो. या प्लॅनमध्ये अ‍ॅड ऑन बेनिफिट देखील मिळतो आणि तुम्ही या प्लॅनमध्ये आणखी 3 नंबर जोडू शकता. प्रत्येक नव्या मेम्बरच्या मागे 30 GB अतिरिक्त डेटा फॅमिलीच्या डेटा पूलमध्ये जोडला जाईल. हे देखील वाचा: भारतीयांसाठी खास भेट! अत्यंत स्वस्तात 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 लाँच

सर्व कनेक्शनना अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, एसएमएस आणि प्लॅनमधील डेटा बेनिफिट मिळतील. ग्राहक या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त नऊ नंबर जोडू शकतो परंतु प्रत्येक कनेक्शन मागे 299 रुपये दयावे लागतील. हा प्लॅन घेणारा नुंबर आणि अ‍ॅड ऑन नंबर एकच राज्य किंवा सर्कलमधील असू शकतात किंवा दुसऱ्या राज्य-सर्कलमधील नंबर देखील या प्लॅनचा फायदा घेऊ शकतील.

अन्य बेनिफिट्स

Airtel पोस्टपेड 999 प्लॅटिनम प्लॅनमध्ये सहा महिन्याचे अ‍ॅमेझॉन प्राइमचे सब्सस्क्रिप्शन मिळत आहे, तर डिज्नी प्लस हॉटस्टारचं वर्षभराचं सब्सस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळतं. एयरटेल या प्लॅनमध्ये विंक म्युजिक आणि फ्री हॅलो ट्यून देखील देत आहे. तसेच यात व्हीआयपी सर्व्हिस, अपोलो 24X7, फास्टटॅग, हँडसेट प्रोटेक्शन आणि ब्लु रिबन बॅग्स सर्व्हिस देखील या प्लॅनमध्ये दिली जात आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री

कोणासाठी आहे हा प्लॅन

हा एयरटेलचा 999 रुपयांच्या प्लॅटिनम पोस्टपेड प्लॅन एका छोट्या कुटुंबाची कॉल्स आणि डेटाची गरज सहज भागवू शकतो. एकूण चार कनेक्शन असल्यामुळे संपूर्ण कुटुंबला वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे एकत्रित वापरावा लागणार डेटा देखील वाया जात नाही. तरी या प्लॅनमधील डेटा कमी पडल्यास कंपनी महिन्याच्या शेवटी डेटा रोलओव्हरचा फायदा देतच आहे. त्यामुळे एखाद्या छोट्या कुटुंबासाठी किंवा 4 मित्रांसाठी देखील हा प्लॅन बेस्ट ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here