200 रुपयांच्या आतील सर्वात बेस्ट प्लान : जियो, एयरटेल, वोडाफोन, आइडिया

भारतीय टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये सतत कोणती ना कोणती टेक कंपनी आपला नवीन प्लान घेऊन येते. एयरटेल, रिलायंस जियो, वोडाफोन, आइडिया किंवा बीएसएनएल सर्व कंपन्या कमित कमी किंमतीत जास्त वॅलिडिटी वाले प्लान्स बाजारात आणले आहेत. याच आठवड्याच्या सुरवातीला आम्ही या सर्व कंपन्यांचे 100 रुपयांच्या आतील प्लान्सची तुलना केली होती, जेणेकरून ग्राहकांना आपला आॅपरेटर व त्यांचे प्लान निवडणे सोप्पे जावो. आज पुन्हा एकदा आम्ही असाच एक रिपोर्ट बनवला आहे ज्यात सर्व टेलीकॉम कंपन्यांचे 200 रुपयांच्या आसपास येणारे प्लॅन्सचा समावेश केला आहे. यातून तुम्ही तुमचा वापर आणि आवडीनुसार बेस्ट प्लान निवडू शकता.

एयरटेल

एयरटेल देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. एयरटेल ने 199 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान मध्ये कंपनी संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. या वॉयस कॉलचा वापर सर्व लोकल व एसटीडी कॉलिंग सह रोमिंग मध्ये पण करता येईल. इंटरनेट डेटा पाहता एयरटेल या प्लान मध्ये रोज 1.4 जीबी डेटा देत आहे जो 28 दिवसांच्या हिशोबाने एकूण 39.2 जीबी डेटा मिळेल. या डेटाचा वापर 4जी सह 3जी नेटवर्क वर पण करता येईल. तसेच प्लान मध्ये कंपनी कडून रोज 100 एसएमएस पण देण्यात येत आहेत.

रिलायंस जियो

ट्राई च्या रिपोर्ट नुसार रिलायंस जियो जुलै महिन्यात देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. जियो ने पण 198 रुपयांचा एक प्लान आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. डेटा बद्दल बोलायचे झाले तर जियो आपल्या ग्राहकांना 2जीबी डेटा प्रतिदिन देत आहे. म्हणजे संपूर्ण महिन्यासाठी एकूण 56जीबी इंटरनेट डेटा मिळेल जो 4जी स्पीड वर वापरता येईल. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री मिळत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. तसेच जियोच्या या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील.

वोडाफोन

वोडाफोन ने 199 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान मध्ये कंपनी संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. या फ्री वॉयस कॉलचा वापर देशातील कोणत्याही नंबर वर अगदी मोफत केला जाऊ शकतो तसेच रोमिंग मध्ये पण हे कॉल फ्री असतील. इंटरनेट डेटा पाहता वोडाफोन च्या या प्लान मध्ये पण एयरटेल प्रमाणे रोज 1.4 जीबी डेटा मिळतो. यूजर 1 महिन्यात 39.2 जीबी डेटा वापरू शकतील. तसेच या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील.

आइडिया

आइडिया ने पण आपल्या यूजर्स साठी 199 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो ज्यात रोज 1.4जीबी इंटरनेट डेटा मिळतो. कंपनी संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. या वॉयस कॉलचा वापर सर्व लोकल व एसटीडी कॉलिंग सह रोमिंग मध्ये पण फ्री असेल. त्याचप्रमाणे आइडिया आपल्या ग्राहकांना रोज 100 एसएमएस पण देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here