​जियो च्या मॉनसून हंगामा आॅफर ला टक्कर देईल एयरटेल ची ही नवीन आॅफर, मिळेल 6 महीने मोफत सर्विस

रिलायंस जियो ने काही दिवसांपूर्वी आपली नवीन आर्कषक आॅफर ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ सुरू केली आहे. या आॅफर अंतर्गत कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात जियो चा 4जी फीचर फोन जियोफोन एक्सचेंज आॅफर सह फक्त 501 रुपयांमध्ये मिळवू शकता. या आॅफर सोबत जियो ने 99 रुपयांचा पॅक पण सादर केला आहे जो इंटरनेट व कॉलिंग सुविधा देतो. जियो ची ही नवीन चाल मोडून काढण्यासाठी एयरटेल ने पण पाऊल उचलले आहे. एयरटेल ने ‘मेरा नया फीचर फोन’ आॅफर सादर केली आहे जी पूर्णपणे जियो च्या आॅफर ला टक्कर देत आहे.

एयरटेल ने मेरा नया फीचर फोन आॅफर लावा सोबत मिळून सादर केली आहे. एयरटेल कोणत्याही नवीन लावा फीचर फोन च्या खरेदीवर 6 महिन्यांसाठी सर्व सेवा मोफत देत आहे. एयरटेल च्या या आॅफर लाभ घेण्यासाठी जुना फोन एक्सचेंज करावा लागणार नाही. कोणत्याही किंमतीचा कोणताही लावा फोन विकत घेतल्यास एयरटेल 6 महिन्यांसाठी म्हणजे 168 दिवस टेलीकॉम सुविधा देईल.

लावा फीचर फोन विकत घेतल्यानंतर त्यात नवीन किंवा जुना कोणताही एयरटेल नंबर वापरता येईल. लावा फोन मधील एयरटेल नंबर वर यूजर्सना 597 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज नंतर एयरटेल नंबर वर अनलिमिटेड वॉयस कॉल ची सर्विस ए​क्टिवेट होईल. एयरटेल ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क किंवा आॅफनेटवर्क कोणत्याही नंबर वर मोफत कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आॅनर 9एन, शाओमी रेडमी नोट 5 ला मिळेल चांगलीच टक्कर

एयरटेल कडून लावा फीचर फोन वर मिळणारे वॉयस कॉल 6 महीने फ्री असतील. एयरटेल या आॅफर अंतर्गत कोणतीही डेटा ची सुविधा देत नाही. तसेच कंपनी कडून एसएमएस ​सर्विस बद्दल पण माहिती मिळाली नाही. दुसरीकडे जियो मॉनसून हंगामा आॅफर अंर्तगत कंपनी रोज 500एमबी इंटरनेट डेटा देत आहे. जियो आॅफर बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here