रिलायंस जियो आपल्या ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ ची सुरवात केली आहे. 21 जुलै पासून ही धमाकेदार आॅफर संपूर्ण देशात सुरू केली आहे. विशेष म्हणजे या आॅफर अंतर्गत जियो आपला 4जी फीचर फोन जियोफोन एक्सचेंज आॅफर सोबत फक्त 501 रुपयांमध्ये विकत आहे. आॅफर मध्ये यूजर आपला जुना फीचर फोन देऊन जियो बेनिफिट मिळवू शकतात. या आॅफर सोबत जियो ने 99 रुपयांचा नवीन प्लान पण सादर केला आहे जो 4जी इंटरनेट डाटा सोबत वॉयस कॉल व एसएमएस ची सुविधा पण देत आहे.
जियो कडून जियोफोन च्या खरेदीवर 99 रुपयांचा नवीन प्लान सादर करण्यात आला आहे. हा एक प्रीपेड प्लान आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. जियो च्या या स्वस्त प्लान मधील फायदे पाहता कंपनी कडून रोज 500एमबी डेटा मिळत आहे जो 4जी स्पीड ने वापरता येईल. 500एमबी प्रतिदिन या हिशोबाने कंपनी आपल्या प्लान मध्ये संपूर्ण महिन्यासाठी एकूण 14जीबी 4जी डेटा देत आहे.
या प्लान मध्ये 4जी डेटा सह संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड वॉयस कॉल पण मिळत आहेत. जियो चे हे वॉयस कॉल कोणत्याही दैनिक लिमिट विना मिळतील आणि यावरुन लोकल व एसटीडी नंबर वर पण कॉल करता येईल. कॉलिंग रोमिंग मध्ये पण पूर्णपणे मोफत असेल. तसेच जियो आपल्या यूजर्सना 28 दिवस 300एसएमएस पण देत आहे.
विशेष म्हणजे जियो मॉनसून हंगामा आॅफर अंतर्गत जियोफोन विकत घेतल्यास ग्राहकांना 99 रुपयांचा हा प्लान विकत घ्यावा लागेल. जियो कडून 99 रुपयांचा प्लान 6 महिन्याच्या बंडल आॅफर सोबत दिला जात आहे ज्याची किंमत 594 रुपये होईल. म्हणजे 501 रुपयां सोबत तुम्हाला 594 पण द्यावे लागतील तेव्हा तुम्हाला 6 महिन्यासाठी हा प्लान मिळेल.
594 रुपयांच्या या प्लान मध्ये यूजर्सना 99 रुपयांच्या प्लान मधील 14जीबी डेटा मिळेल सोबत जियो कडून अतिरिक्त 6जीबी 4जी डेटा पण मिळेल. म्हणजे यूजर्सना एकूण (14X6=84, 84+6=90) 90जीबी इंटरनेट डेटा मिळेल. पण या 6जीबी डेटा चा वापर रोजचा 500एमबी डेटा वापरल्या नंतर करता येईल की एका महिन्याच्या हिशोबाने फक्त 1जीबी डेटा मिळेल याची माहिती लवकरच मिळेल.