Airtel ने पुन्हा मागे टाकले Jio ला, जाणून घ्या कोणती होती शर्यत

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) द्वारे जारी टेलीकॉम सब्सक्रिप्शन रिपोर्टनुसार ऑक्टोबर मध्ये एयरटेलने पुन्हा एकदा 3.67 मिलियन पेक्षा जास्त नवीन वायरलेस ग्राहक जोडून रिलायंस जियोला मागे टाकले आहे. Airtel ने Jio च्या तुलनेत 1.45 मिलियन पेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. तसेच ऑक्टोबर मध्ये 2.22 मिलियन वायरलेस ग्राहकांना मिळवण्यात यश मिळवले आहे. एयरटेलने आपल्या नेटवर्क वर 96.74 टक्के सक्रिय ग्राहकांसह सक्रिय वापरकर्त्यांच्या बाबतीत पण एक प्रमुख स्थान मिळवले आहे.

ऑक्टोबरच्या आधी सप्टेंबर मध्ये एयरटेल चार वर्षानंतर सब्सक्राइबर जोडनेच्या बाबतीत टॉपला आली होती. ट्रायने दिलेल्या नवीन आकड्यांमधून समजले आहे कि एयरटेलचा वायरलेस सब्सक्राइबर बेस ऑक्टोबर मध्ये 330.28 मिलियन पर्यंत पोहोचला, जो सप्टेंबर मध्ये 326.66 मिलियन होता. कंपनीने एका महिन्यात 3.67 मिलियन नवीन ग्राहक जोडले.

याउलट Jio ने ऑक्टोबर मध्ये 406.35 मिलियन वायरलेस ग्राहकांसह भारतात सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी असल्याचे मान कायम ठेवला आहे. जियोचे सप्टेंबर मध्ये 404.12 मिलियन ग्राहक होते.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A72 4G बद्दल झाला मोठा खुलासा, येईल या फीचर्स सह

Airtel आणि Jio च्या उलट, Vi (Vodafone Idea) ने ऑक्टोबर मध्ये 2.65 मिलियन ग्राहकांची घसरण नोंदवली होती, कंपनीकडे सप्टेंबर मध्ये 295.49 मिलियन वापरकर्ता होते ते 292.83 मिलियन झाले. तसेच, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने त्याच महिन्यात 10,215 वायरलेस ग्राहक गमावले, कंपनीचा एकूण वायरलेस ग्राहक आधार 118.88 मिलियन होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here