साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग पुढल्या वर्षासाठी गुपचूप मोठी तयारी करत आहे. यावर्षी प्रमाणेच कंपनी नवीन वर्षात पण नवीन फोन्स सादर करून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बजेट मध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध करणार आहे. काही दिवसांपासून नवीन वर्षात आगामी Samsung Galaxy A72 बद्दल माहिती समोर येत आहे, जी आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट वर पण स्पॉट केला गेला आहे. आता हा फोन कथितरित्या गीकबेंच लिस्टिंग मध्ये दिसला आहे, ज्यामुळे समजले आहे कि स्मार्टफोनच्या 4G वेरिएंट मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट असेल.
गीकबेंच लिस्टिंग
गीकबेंच वर लिस्टिंग नुसार, मॉडेल नंबर SM-A725F सह एक सॅमसंग फोन, जो Galaxy A72 4G असल्याचे बोलले जात आहे. तसेच फोनला सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये क्रमश: 526 आणि 1,623 स्कोर मिळाले आहेत. सोबतच लिस्टिंग मध्ये समजले आहे कि डिवाइस क्वालकॉम प्रोसेसर सह येईल, ज्याचे नाव ‘atoll’ आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट असल्याचे बोलले जात आहे. आशा आहे कि फोन 8 जीबी रॅम आणि अँड्रॉइड 11 वर काम करेल.
हे देखील वाचा : भारतात येत आहे सर्वात पावरफुल फोन Oppo Reno 5 Pro 5G, लॉन्चच्या आधी इंडियन साइटवर झाला लिस्ट
गॅलेक्सी ए52 4जी आणि सॅमसंग गॅलेक्सी ए72 4जी
काही दिवसांपूर्वीच Galaxy A52 4G स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह बेंचमार्किंग वेबसाइट वर पण दिसला होता. तसेच, गॅलेक्सी ए52 4जी आणि सॅमसंग गॅलेक्सी ए72 4जी चे गीकबेंच रिजल्ट सारखेच वाटत आहेत.
डिजाइन
अलीकडेच एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन 4जी आणि 5जी दोन कनेक्टिविटी वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. सोबतच एका टिपस्टरने या फोनचे काही रेंडर पण लीक केले होते, ज्यात फोनच्या डिजाइनची माहिती समोर आली होती. रेंडर्स वरून समजले होते कि फोन मध्ये फ्लॅट होल-पंच कटआउट असेल.

हे देखील वाचा : Lava चा दावा, 7 जानेवारीला करेल मोठा धमाका, चीनी कंपन्यांना मिळेल टक्कर, बदलेल बाजार
फोन मध्ये बॅक पॅनल वर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल चार सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश आहे जो सॅमसंगच्या ब्रँडिंग सह येतो. फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. सोबतच डिवाइस मध्ये 3.5mm ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल, माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट बॉटमला आहेत. फोनच्या टॉपला सिम ट्रे देण्यात आला आहे.
कॅमेरा आणि लॉन्च डेट
गॅलेक्सी ए72 4जी मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. सॅमसंग गॅलेक्सी A72 5G लॉन्च 2021 च्या पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता आहे. पण अजूनतरी कंपनीने कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.















