Airtel ची घोषणा, 17 एप्रिल पर्यंत वाढेल प्लान्सची वैधता आणि 8 कोटी यूजर्सना मिळेल 10 रुपयांचा टॉकटाइम अगदी मोफत

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

Coronavirus मुळे संपूर्ण भारत देश Lockdown आहे. हा लॉकडाउन 21 दिवस असेल जो 14 एप्रिल पर्यंत चालू राहील. या काळात आपल्या यूजर्सची समस्या लक्षात घेऊन सर्व टेलीकॉम कंपन्या नवीन प्लान घेऊन येत आहेत किंवा जुन्या प्लान्स मध्ये बदल करून ग्राहकांना अतिरिक्त फायदे देत आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या प्राइवेट कंपन्या आणि सरकारी कंपनी BSNL पण आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी काम करत आहे. यात आज एयरटेलने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या 8 कोटी यूजर्सना 17 एप्रिल पर्यंत अतिरिक्त प्लान वॅलिडिटी आणि 10 रुपयांचा टॉकटाईम मोफत देईल.

Airtel ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या यूजर्सच्या चालू प्लान्सची वैधता मोफत वाढवून देत आहे. प्रीपेड यूजर्सच्या चालू प्लानची वॅलिडिटी आता वाढवून 17 एप्रिल केली जाईल. एयरटेलच्या या घोषणेचा फायदा त्या यूजर्सना सर्वात जास्त फायदा होईल ज्यांचा प्लान लवकरच संपणार होता. म्हणजे Airtel ग्राहकांना अडीच आठवड्यांची अतिरिक्त वैधता मिळेल आणि कंपनी हे बेनिफिटी पूर्णपणे फ्री देईल.

एयरटेलच्या मते हा फायदा सर्वात जास्त त्या ग्राहकांना मिळेल जे खासकरून इनकमिंगसाठी किंवा आपला नंबर चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करतात. Airtel नुसार कंपनी नेटवर्क वरील जवळपास 8 कोटी भारतीयांना या स्कीमचा लाभ मिळेल. 17 एप्रिल पर्यंत प्लानची वैधता वाढल्यामुळे प्लान संपल्यावर पण इनकमिंग कॉलची सुविधा चालू राहील.

त्याचबरोबर Airtel ने शब्द दिला आहे कि अश्याच प्रकारे 8 कोटी एयरटेल यूजर्सच्या नंबरवर कंपनी 10 रुपयांचा टॉकटाईम पण क्रेडिट करेल. म्हणजे एयरटेल कडून प्लानची वॅलिडिटी वाढवल्यानंतर कंपनीच्या ग्राहकांना मोफत इनकमिंग सुविधा मिळेल तर दुसरीकडे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी या यूजर्सना 10 रुपयांचा टॉकटाईम पण मोफत दिला जाईल.

या कंपन्या पण देत आहेत फ्री बेनिफिट

BSNL चे प्रीपेड सिम 20 एप्रिल पर्यंत बंद केले जाणार नाहीत. तसेच 10 रुपयांचा टॉक टाइम पण यूजर्सना दिला जाईल. जेणेकरून गरीब आणि गरजू लोक एकमेकांशी संपर्कात राहू शकतील.

अलीकडे वोडाफोनने आपल्या 95 रुपयांच्या पॅकची वैधता वाढवली आहे. वोडाफोनने 95 रुपयांच्या प्लान मध्ये वैधता वाढवून 56 दिवस वैधता केली आहे. याआधी याची वैधता 28 दिवस होती.

Reliance Jio ने आपल्या ‘जियो डेटा पॅक’ अंतर्गत रोज 2 जीबी मोफत डेटा देण्याची घोषणा केली होती. हा डेटा पॅक 1 एप्रिल पर्यंत वैध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here