Jio नंतर आता Airtel नं देखील दिला ग्राहकांना धक्का; लोकांच्या आवडीचे 4 प्लॅन केले बंद

Reliance Jio नं काही दिवसांपूर्वी आपल्या युजर्सना नाराज करत 2 रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत, ज्यात Disney+ Hotstar सब्सकिप्शन दिलं जात होतं. तर दुसरीकडे टेलीकॉम सेक्टरच्या आणखी एका मोठ्या कंपनी Airtel नं देखील ग्राहकांना धक्का देत Disney+ Hotstar सब्सकिप्शन असलेल्या रिचार्ज प्लॅन्समधून हा बेनिफिट काढला आहे. तसेच कंपनीनं आपले काही रिचार्ज प्लॅन आपल्या वेबसाइटवरून हटवले आहेत. परंतु कंपनीनं पूर्णपणे हॉटस्टार प्रेमींकडे दुर्लक्ष केलं नाही, एयरेटलकडे दोन पॅक अजूनही आहेत जे डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन मोफत देतात. चला जाणून घेऊया त्यांची माहिती.

Airtel चे रिचार्ज प्लॅन बंद

एयरटेल युजर्सना 181 रुपये, 399 रुपये, 599 रुपये, 839 रुपये आणि 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आधी डिज्नी प्लस हॉटस्टारचा फ्री सब्सक्रिप्शन मिळत होतं. परंतु, आता कंपनीनं गुपचूप या प्लॅनमध्ये मिळणारा हा ओटीटी बेनिफिट्स काढून टाकला आहे. हे सर्वच प्लॅन रिचार्जसाठी उपलब्ध नाहीत यातील 399 रुपये आणि 599 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या साइट वरून हटवण्यात आला आहे, म्हणजे आता हे दोन रिचार्ज प्लॅन एयरटेल ग्राहकांसाठी उपलब्ध नाहीत. तर 181 रुपये 839 रुपये आणि 2999 रुपयांचे रिचार्ज प्लॅन ओटीटी बेनिफिटविना रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध आहेत.

या रिचार्ज सोबत मिळेल Disney+ Hotstar

जियो प्रमाणे एयरटेलनं Disney+ Hotstar सब्सस्क्रिप्शनचा पर्याय पूर्णपणे बंद केलं नाही. कंपनीच्या दोन रिचार्ज प्लॅन्स सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचा फ्री सब्सक्रिप्शन अजूनही मिळत आहे. कंपनी 499 रुपये आणि 3359 रुपयांच्या रिचार्जवर हा बेनिफिट देत आहे. हे देखील वाचा: 4 किंवा 6 नव्हे तर तब्बल 12GB RAM सह Vivo V21s 5G ची एंट्री; कॅमेरा देखील आहे पावरफुल

ओटीटी बेनिफिटसह 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नंबरवर अमर्याद कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच कंपनी ग्राहकांना रोज 100 SMS देते आणि रोज 2GB डेटा देखील दिला जात आहे. एयरटेलच्या या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं तीन महिन्याचं सब्सस्क्रिप्शन मिळतं.

या नंतर कंपनीकडे 3359 रुपयांचा प्लॅन आहे ज्यात फक्त Disney+ Hotstar नव्हे तर Amazon Prime चं सब्सस्क्रिप्शन देण्यात आलं आहे. 3359 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचा देखील वापर करता येईल. अन्य बेनिफिट्स पाहता, हा प्लॅन डेली 2.5GB डेटा, प्रतिदिन 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉल्ससह 365 दिवसांची वैधता देतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here