तब्बल 8GB RAM सह Vivo V21s 5G ची एंट्री; 64MP कॅमेऱ्यासह तैवानमध्ये झाला लाँच

विवो कंपनीनं एप्रिलमध्ये आपली Vivo V21 Series भारतीय बाजारात सादर केली होती ज्यात मिडबजेट स्मार्टफोन लाँच झाले होते. तसेच आता कंपनीनं या सीरीजचा अजून एक नवीन मोबाइल फोन Vivo V21s 5G लाँच केला आहे. विवो वी21एस 5जी फोन तैवानमध्ये लाँच झाला आहे जो 64MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 800U चिपसेट आणि 33W fast charging सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. पुढे आम्ही Vivo V21s 5G Price आणि Specifications ची संपूर्ण माहिती दिली आहे.

Vivo V21s 5G चे स्पेसिफिकेशन

विवो वी21एस 5जी फोन 2404 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेली ही स्क्रीन 800निट्स ब्राइटनेस, 60,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि एचडीआर10+ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. या नवीन विवो मोबाइल फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

Vivo V21s 5G फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. विवो वी21एस 5जी फोन 4जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्याच्या मदतीनं हा विवो मोबाइल 12जीबी रॅमची पावर मिळवू शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हे देखील वाचा: भन्नाट! 160MP Rear आणि 50MP Selfie Camera; मोबाइल फोटोग्राफर्सच्या स्वप्नातला फोन येतोय

फोटोग्राफीसाठी Vivo V21s 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो मोबाइलमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V21s 5G फोन पावर बॅकअपसाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक, एनएफसी, ब्लूटूथ आणि वायफाय सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात तसेच हा फोन 5जी व 4जी दोन्हीवर चालतो. विवो वी21एस 5जी फोनचे डायमेंशन 159.68 X 73.90 X 7.39एमएम आणि वजन 177ग्राम आहे. हे देखील वाचा: सॅमसंगचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मिळतोय अत्यंत स्वस्तात; 5G कनेक्टिव्हिटीसह 4 शानदार कॅमेरे

Vivo V21s 5G ची किंमत

विवो वी21एस 5जी फोन तैवानमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला जो 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत NT$ 11,490 आहे जी भारतीय करंसीनुसार 30,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा विवो मोबाइल भारतीय बाजारात लाँच होईल किंवा नाही याची अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु परदेशी बाजारात हा फोन Dark Blue आणि Colorful कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here