एयरटेल ने सादर केला धमाकेदार प्लान, 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 3जीबी डेटा

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

टेलीकॉम क्षेत्रात कंपन्या बाजारात स्वस्त रिचार्ज व टॅरिफ प्लॅन सादर करत आहे. दुसरीकडे यूजर्सना जास्तीत जास्त इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा चालू आहे. ते पाहता एयरटेल आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन प्लॅन घेऊन आली आहे. या प्लानची किंमत 148 रुपये आहे.

या प्लॅन मध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह 3जीबी डेटा मिळेल. हा रिचार्ज “स्पेशल रिचार्ज-एसटीवी कॉम्बो” कॅटेगरी मध्ये सादर केला गेला आहे. या प्लॅन मध्ये यूजर्सना 100 एसएमएस प्रति दिन मिळतात. सोबतच एयरटेल टीवी आणि विंक म्यूजिकचे सब्सक्रिप्शन मिळेल.

हा प्लॅन एयरटेलच्या वेबसाइट वर लिस्ट आहे. सध्या या प्लानचा लाभ आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सोबतच कर्नाटक सर्कल मधील लोकांना मिळेल. तसेच इतर राज्यांतील लोकांसाठी प्लॅन लवकरच लाइव होईल.

अलीकडेच एयरटेल ने आपल्या 1,699 रुपयांच्या लॉन्ग टर्म प्रीपेड प्लॅन मध्ये बदल केले होते. आता एयरटेल या प्लॅन सह आपल्या यूजर्सना डेली 1.4जीबी डेटा ऑफर करत आहे. आधी कंपनी या प्लॅन सह यूजर्सना 1जीबी इंटरने डेटा ऑफर करत होती एयरटेलच्या या लॉन्ग टर्म प्लानची वॅलिडिटी 365 दिवस होती. या प्लॅन मध्ये यूजर्सना अनलिमिडेट कॉलिंग आणि रोमिंग सह 100 एसएमएस पण मिळत आहेत.

या प्लानची टक्कर कंपनीच्या रिलायंस जियोच्या 149 रुपयांच्या प्लॅनशी होईल. या प्लॅन मध्ये यूजर्सना रोज 1.5जीबी डेली डेटा सह एयरटेलच्या 148 प्लॅन प्रमाणे अनलिमिडेट कॉलिंग आणि एसएमस मिळतील. तसेच जियोच्या ऍप्स जसे जियो टीवी आणि जियो सीनेमाचे सब्सक्रिप्शन मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here