रिलायंस जियोने स्वस्त प्लान सुरु केल्यापासून भारती एयरटेल पण स्वस्त प्लान सादर करून जियोला मागे टाकण्याचे प्रयत्न करत आहे. जियो स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली आहे आणि आता एयरटेल पण 4जी स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. यासाठी एयरटेल लवकरच काही स्मार्टफोन कंपन्यांशी हात मिळवणी करू शकते. पण अजूनही जियो आणि एयरटेलने अधिकृतपणे फोनची लॉन्च डेट आणि डिवाइस बाबत कोणतीही माहिती समोर ठेवली नाही.
ET च्या रिपोर्टनुसार सध्या एयरटेल भागेदारीसाठी स्थानिक ब्रँड्स शोधत आहे. तसेच कंपनीचा प्रयत्न रिलायंस जियोकडे 2जी यूजर्स जाऊ नये असा आहे. कारण भारतात जवळपास 40 कोटी लोक असे आहेत जे अजूनही फीचर फोनचा वापर करत आहेत. त्यामुळे या लोकांवर टेलीकॉम कंपन्यांची नजर आहे. रिपोर्टनुसार एयरटेल स्वस्त स्मार्टफोनसाठी माइक्रोमॅक्स आणि लावा सारख्या भारतीय मोबाईल कंपन्यांशी बोलणी करत आहे.
तसेच एयरटेलचा नवीन फोन लॉक्ड आणि अनलॉक्ड दोन्ही प्रकारे येऊ शकतो. भारतात लॉक्ड डिवाइसची पद्धत नाही पण अमेरिका आणि इतर अनेक पाश्चिमात्य मार्केट मध्ये टेलिकॉम ऑपरेटर्स स्मार्टफोन कंपन्यांसोबत मिळून असे फोन्स आणतात जे टॅरिफ प्लान किंवा मंथली पेमेंट ऑप्शन सह येतात.
याआधी पण केले आहे स्वस्त स्मार्टफोन वर काम
विशेष म्हणजे एयरटेलने आधीपण भारतीय ब्रँड Celkon सह भागेदारी करून ‘मेरा पहला स्मार्टफोन’ प्रोग्रामची सुरवात केली होती. यांतर्गत एयरेटल स्वस्तात 4जी स्मार्टफोन देत होती. डाउन पेमेंट दिल्यावर फोन दिला जात होता, जो चालू ठेवण्यासाठी दार महिन्याला रिचार्ज करावा लागत होता.
हे देखील वाचा: Jio ला आव्हान देण्यासाठी Airtel देत आहे स्वस्त प्लान मध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट
गूगल सोबत जियोने केली भागेदारी
Google सह आपल्या पार्टनरशिपची घोषणा करत Mukesh Ambani बोलले होते कि गूगलने रिलायंस जियो मध्ये 7.7 टक्के गुंतवणूक केली आहे. Jio मध्ये गुंतवणूक केल्या गेलेल्या या शेयरची रक्कम 33,737 कोटी रुपये आहे. तसेच त्यांनी सांगितले होते गूगल आणि जियो मिळून देशात ‘डिजीटल इंडिया’ च्या दिशेने काम करतील आणि भारतातील 4जी व 5जी फोन्सची निर्मिती करतील.














