Amazon Great Freedom Festival Sale 2022: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर प्राईम मेंबर्ससाठी Great Freedom Festival सेल 2022 लाईव्ह झाला आहे. अॅमेझॉनवर हा सेल सामान्य युजर्ससाठी 6 ऑगस्टपासून सुरु होईल. अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 10 ऑगस्टपर्यंत सुरु असेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, लैटपटॉप, टीव्ही आणि अन्य होम अप्लायन्सेससह सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्टवर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अॅमेझॉनवरील Great Freedom Festival सेलवरील स्मार्टफोन डील्सची मदत घेऊ शकता. पुढे आम्ही तुम्हाला अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेलमधील स्मार्टफोनवर मिळणाऱ्या धमाकेदार डिस्काउंट बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Amazon Great Freedom Festival Sale 2022 : Best Smartphone Deals
iPhone 13
Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले, OLED पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. यात Apple A15 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. अॅप्पलचा हा फोन 4GB रॅम आणि 128GB/256GB/512GB स्टोरेज ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3240mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. Apple iPhone 13 स्मार्टफोन iOS 15 वर चालतो.
प्राईस – 79900 रुपये
डील प्राईस – 66900 रुपये
Samsung Galaxy M53 5G
Samsung Galaxy M53 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कटआउटसह येणार हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह बाजारात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर आणि Mali-G68 MP4 GPU देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. फोन Android 12 आधारित OneUI 4.2 कस्टम स्किनवर चालतो. Galaxy M53 5G मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाईड लेन्स, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
प्राईस – 32999 रुपये
डील प्राईस – 24999 रुपये
Redmi K50i 5G
Redmi K50i 5G मध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. तसेच यात Dolby Vision, ब्राईटनेस 650 निट्स आणि HDR10+ सपोर्ट मिळतो. Redmi K50i मध्ये Android 12 आधारित MIUI देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 SoC ची प्रोसेसिंग पावर मिळते. Redmi K50i 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर मिळतो. या फोनमध्ये 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
प्राईस – 31999 रुपये
डील प्राईस – 25999 रुपये
OnePlus 10R 5G
OnePlus 10R स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. वनप्लसचा हा फोन MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसरसह बाजारात आला आहे आणि Android 12 आधारित OxygenOS वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ड्युअल-बँड Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टीरियो स्पिकर देखील मिळतात. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आहे, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाईड Sony IMX355 सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 10R मध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग असे दोन ऑप्शन मिळतात.
प्राईस – 38999 रुपये
डील प्राईस – 34999 रुपये
Realme Narzo 50 Pro 5G
Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा Full-HD सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा मिळते. या फोनमध्ये Android 12 वर आधारित Realme UI 3.0 देण्यात आला आहे. कंपनीनं MediaTek Dimensity 920 5G चिपसेटचा वापर यात केला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W डार्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. Realme Narzo 50 Pro स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे.
प्राईस – 25999 रुपये
डील प्राईस – 20999 रुपये
iQOO Neo 6 5G
iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. आयकूचा हा फोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर आणि Adreno 650 GPU सह येतो. हा फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. फोन Android 12 आधारित Funtouch OS कस्टम स्किनवर चालतो. iQOO Neo 6 मध्ये 4,700mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टम आणि स्टीरियो स्पिकर, Hi-Fi ऑडियो आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर 16MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगच्या कामी येतो.
प्राईस – 34,999 रुपये
डील प्राईस – 29,999 रुपये
OnePlus Nord 2T 5G
OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा Full-HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि याला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा मिळते. वनप्लसचा हा फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो. OnePlus Nord 2T मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 f/1.8 सेन्सर आहे, सोबतीला 8MP अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सर आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP चा शूटर देण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित Oxygen OS 12.1 वर चालतो.
प्राईस – 29,999 रुपये
डील प्राईस – 28,999 रुपये
Redmi Note 11 Pro+ 5G
Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये AMOLED पॅनलचा वापर करण्यात आहे, ज्याची पीक ब्राईटनेस 1200 निट्स, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि Corning Gorilla Glass 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमीचा हा फोन 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर फ्रंटला 16MP चा कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI 13 वर चालतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
प्राईस – 24,999 रुपये
डील प्राईस – 19,999 रुपये
Samsung Galaxy M13 5G
Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो. सॅमसंगचा हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि Mali G57 ग्राफिक्ससह येतो. सॅमसंगचा हा फोन Android 12 OS आधारित OneUI 4.0 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये साइड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कनेक्टव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे सोबतीला 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राईस – 16,999 रुपये
डील प्राईस – 13,999 रुपये
Redmi 10 Prime
Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 X 1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. रेडमीचा हा फोन MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि Mali-G52 MC2 सह येतो. हा फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS/AGPS, GLONASS, IR Blaster, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. Redmi 10 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, सोबतीला 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 6000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
प्राईस – 14,999 रुपये
डील प्राईस – 10,999 रुपये














