Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर

Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन

गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि डिजाईनची याची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन अ‍ॅलुमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच बॅक आणि फ्रंट पॅनलवर कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनला आयपीएक्स8 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटरप्रूफ बनतो.

Samsung Galaxy Z Flip 5 च्या डिस्प्लेमध्ये मोठा बदल

गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोनची प्रायमरी स्क्रीन 22:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येते आणि हा 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. हा तो डिस्प्ले आहे जो फोन उघडल्यावर समोर येईल. सॅमसंगनं ह्याला Infinity Flex Display नाव दिलं आहे.

तर फोन फोल्ड केल्यावर जी स्क्रीन समोर येईल तिचा आकार 3.4 इंच आहे. हा डिस्प्ले 720 x 748 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आहे सुपर अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ह्या सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्झ रिफ्रेश तसेच 306पीपीआय सारखे फीचर्स आहेत. ह्यात मोबाइल ओपन करता डायलर पॅडचा वापर केला जाऊ शकतो तसेच कॉल लावता येतो.

Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर : सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी फोन अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो वनयुआय 5.1.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.36गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर तसेच एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये ओआयएस तसेच ड्युअल पिक्सल एएफ सारखे फीचर्स मिळतात.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy Z Flip 5 5G फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्या कॅमेरा लेन्सची पिक्सल साईज 1.22μm तर फोनचा फ्रंट कॅमेरा 85˚FOV (फील्ड ऑफ व्यू) आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 3,700एमएएचची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here