अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास

Highlights

  • Ampere Zeal EX], electric scooter कंपनीनं स्पोर्टी लुकमध्ये सादर केली आहे.
  • हिची किंमत Rs 69,900 (ex-showroom) ठेवण्यात आली आहे.
  • e-scooter सिंगल चार्जमध्ये 120km ची रेंज देऊ शकते.

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ampere नं आपली आपला लेटेस्ट Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे कंपनीची ही स्कूटर कमी किंमतीत जास्त रेंज देते. इतकेच नव्हे तर Ampere Zeal EX ला कंपनीनं खूप स्टाइलिश बनवलं आहे. यात तुम्हाला स्पोर्टी लुक मिळेल जो तरुणवर्गाला खूप आवडतो. तसेच, स्कूटरमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहक रोजच्या प्रवासातही हीचा सहज वापर करू शकतील.

Ampere Zeal EX price

जेव्हा मोठी राइड घेण्याची वेळ येते तेव्हा नवीन अँपियर झील ईएक्स चांगला पर्याय ठरू शकते कारण ही एकदा चार्ज केल्यावर 120 किमीची रेंज देते. ही ई-स्कूटर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 69,900 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत सादर करण्यात आली आहे. तर भारतातील अन्य शहरांमध्ये हिची प्राइस 75,000 रुपये (एक्स-शोरूम) असेल. तासेक्स मूळ कंपनी ग्रीव्स मोबिलिटीनं देखील 31 मार्च, 2023 पूर्वी Zeal EX च्या खरेदीवर 6,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट्स देण्याची घोषणा केली आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

Ampere Zeal EX चे specifications आणि features

परफॉर्मन्स पाहता Ampere Zeal EX मध्ये 1.8kW ची पीक पावर असलेली मोटर देण्यात आली आहे, जी तुम्हाला ताशी 50-55 किमीचा टॉप स्पीड देते. यात तुम्हाला 120 किमीची रेंज देण्यासाठीसाठी 60V, 2.3 KWh ची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.

तसेच Ampere Zeal EX मध्ये ड्रम ब्रेक, फ्रंट (टेलिस्कोपिक) आणि रियर (ट्विन ट्यूब) सस्पेंशन देण्यात आले आहेत. तसेच ही स्कूटर 150 किलोग्रामचा लोड वाहून नेऊ शकते. चार्जर पाहता, अँपियरमध्ये 60V, 7.5A Li चा बंडल आहे जो ई-स्कूटरला 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करेल. ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अँपियर व्हेईकल्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी, चार्जर, मोटर, कंट्रोलर आणि कन्वर्टरवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. हे देखील वाचा: फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात अँपियरनं भारतीय बाजारात आपली प्राइमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. ही स्कूटर 107km रेंज, 77kmph चा टॉप स्पीड आणि अनेक टू-टोन कलर ऑप्शनसह बाजारात आली आहे. जिची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here