अशी असेल Apple च्या अपकमिंग लो बजेट iPhone SE 3 ची डिजाइन, आवडली का तुम्हाला?

अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि टेक विश्वातील दिग्गज कंपनी Apple आपल्या स्वस्त iPhone SE च्या नवीन वेरिएंट iPhone SE 3 (iPhone SE Plus) वर काम करत आहे. हा डिवाइस यावर्षी iPhone 13 सीरीजसह सादर केला जाणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि iPhone SE 3 आधीच्या मॉडेलच्या तुलनेत जास्त फीचर्स आणि शानदार डिजाइनसह येईल. कंपनीने अधिकृतपणे फोनबद्दल अजूनतरी कोणतीही माहिती शेयर केली नाही, आता या फोनची काॅन्सेप्ट डिजाइन समोर आली आहे. हि कॉन्सेप्ट डिजाइन Svetapple.sk ने जारी केला आहे.

लुक व डिजाइन

फोटोज मध्ये स्पष्ट दिसत आहे कि iPhone SE 3 मध्ये सर्वात मोठा बदल या फोनच्या होम बटन मध्ये दिसेल. कॉन्सेप्ट डिजाइन मध्ये दाखवण्यात आले आहे कि फोन मध्ये कोणतेही होम बटन असणार नाही. तसेच फोन मध्ये अगदी नगण्य बेजल्स असतील. रेंडर इमेज मध्ये समोर आले आहे कि ऍप्पल यावेळी आपल्या स्वस्त फोन मध्ये मध्ये होल-पंच सेल्फी कॅमेरा देणार आहे. नवीन iPad Air प्रमाणेच iPhone SE 3 मध्ये फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या फ्रेम मध्ये असेल. दिसायला याची डिजाइन iPhone 12 सीरीज प्रमाणेच वाटत आहे. फोनची बॉडी अल्युमिनियमची बनलेली असेल.

हे देखील वाचा : Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर DND ऍक्टिव्हेट करण्याची सर्वात सोप्पी पद्धत, काही सेकंदात मिळवा स्पॅम कॉल्सपासून मुक्तता

स्पेसिफिकेशेन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.4-इंच 1080p OLED पॅनल असेल जसा आपण iPhone 12 Mini मध्ये बघितला होता. तसेच इनफोग्राफिक मध्ये अशी माहिती समोर आली आहे कि iPhone SE 3 मध्ये A14 Bionic चिपसेट असेल.

कॅमेरा पाहता iPhone SE 3 मध्ये सिंगल 12 मेगापिक्सल सेंसर फ्रंट आणि मागच्या बाजूला असेल. तसेच, Apple अनॅलिस्ट Ming-Chi-Kuo यांचे म्हणणे आहे कि iphone SE 3 2021 च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये लाॅन्च केला जाणार नाही.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने अशी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max असे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील. कंपनीने अजूनतरी आयफोन 13 सीरीजबद्दल पण कोणतीही माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here