मोबाईल फोन आज आपल्या आयुष्यसाठी आवश्यक ठरला आहे, पण कधी कधी मोबाईल फोनवर येणाऱ्या टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्सचा आपल्याला नेहमीच त्रास होतो. नेहमी असे कॉल कामात असताना येतात. आपण हे कॉल रिसीव करतो आणि नंतर विचार करतो कि हे कॉल्स बंद करण्याची एखादी सर्विस असती तर. हीच समस्या लक्षात ठेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या एका सर्विसबाबत सांगणार आहोत. हि कोणतीही खास ट्रिक नाही तर या सर्विसला DND (डू नॉट डिस्टर्ब) म्हटले जाते. या आर्टिकल मध्ये आम्ही Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या युजर्ससाठी हि सर्विस ऍक्टिव्हेट करण्याची सोप्पी पद्दत सांगणार आहोत.
रिलायंस जियो युजरसाठी
– सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये My Jio ऍप इंस्टॉल करा.
– त्यानंतर ऍप मध्ये लॉगइन करा.
– आता डावीकडे दिसत असलेल्या आयकॉनवर टॅप करून सेटिंग्स मध्ये जा.
– इथे देण्यात आलेला DND सिलेक्ट करा.
– त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून मेसेज मिळेल, ज्यात लिहिले असेल कि सात दिवसात तुमच्या नंबरवर DND सर्विस ऍक्टिव्हेट होईल.
हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत
एयरटेल युजरसाठी
– सर्वप्रथम तुम्हाला Airtel च्या वेबसाइटवर जावे लागेल आणि मग ‘एयरटेल मोबाईल सर्विस’ बटनवर क्लिक करावे लागेल.
– त्यांनतर स्क्रीनवर आलेल्या पॉप-अप बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर टाका.
– असे केल्यानंतर फोनवर एक ओटीपी येईल, तो एंटर करा.
– त्यानंतर stop all options वर टॅप करा.
– तुमच्या नंबरवर आता DND सर्विस ऍक्टिव्हेट होईल.
वोडाफोन-आयडिया युजरसाठी
– सर्वप्रथम Vi च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या DND पेजवर जा.
– इथे नाव, ईमेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
– त्यानंतर फुल DND ऑप्शनसाठी yes वर क्लिक करा.
– त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल.
– हा कोड टाकून सबमिट बटनवर क्लिक करा.
– असे केल्यानंतर तुमच्या नंबरवर डीएनडी सर्विस ऍक्टिव्हेट होईल.
हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा
BSNL किंवा MTNL नंबर युजर्ससाठी
-BSNL आणि MTNL युजर्सना सर्वप्रथम START 0 लिहून 1909 वर मेसेज पाठवावा लागेल. असे केल्यानंतर डू नॉट डिस्टर्ब सर्विस ऍक्टिव्हेट होईल.
– मेसेज व्यतिरिक्त युजर्स 1909 वर कॉल करून हि सर्विस ऍक्टिव्हेट करू शकतात.