Apple बाबत मोठी बातमी, चीन सोडून भारतात येत आहेत 6 नवीन प्रोडक्शन लाईन्स

Apple बाबत अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी फक्त भारतात आपली मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी व प्रोडक्टशन वाढवणार आहे तसेच कंपनीच्या फ्लॅगशिप फोन iPhone 11 ची निर्मिती पण भारतात सुरु झाली आहे. अशी माहिती मिळाली होती कि आईफोन 11 सोबतच ऍप्पल येत्या काळात iPhone SE 2020 पण भारतातचा बनवेल. तर आता ऍप्पल संबंधित मोठी बातमी समोर येत आहे कि कंपनी चीन मधील संपूर्ण प्रोडक्शन लाईन बंद करून भारतात घेऊन येणार आहे आणि येत्या काळात फक्त iPhone नाही तर iPad, iMac आणि MacBook पण ‘Make In India’ असतील.

मिळालेल्या माहितीनुसार Apple कंपनी चीन मधील आपले प्रोडक्शन शिफ्ट करून भारतात आणण्याचा विचार करत आहे. TOI च्या रिपोर्टनुसार ऍप्पल जवळपास 6 प्रोडक्शन लाईन्स चीन मध्ये बंद करून त्या भारतात स्थापन करण्याची योजना बनवत आहे. आशा आहे कि भारतात सुरु होणाऱ्या या प्रोडक्शन लाइन्स वर फक्त आईफोनच नाही तर आईपॅड, आईमॅक आणि मॅकबुकची निर्मिती पण केली जाईल.

मिळतील 55,000 नोकऱ्या

प्रसिद्ध अमेरिकन कंपनी Apple ने भारतात प्रोडक्शन सुरु केल्याने फक्त जगभरात ‘ इंडिया’ निर्मित आईफोन व इतर प्रोडक्ट्स विकले जातील असे नाही तर सोबत या नवीन लाईन्समुळे देशात हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील. मीडिया रिपोर्टनुसार ऍप्पलने जर चीन मध्ये आपले काम बंद करून ते भारतात सुरु केले तर देशात जवळपास 55,000 नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि मोठ्या प्रमाणात भारतीयांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील.

स्वस्त मिळतील Apple प्रोडक्ट

Apple कंपनीने भारतात आपल्या फ्लॅगशिप फोन iPhone 11 चे प्रोडक्शन सुरु केले आहे. iPhone 11 भारतात इम्पोर्ट केल्यावर Apple ला जवळपास 22 टक्के आयात शुल्क दयावे लागत होते. या टॅक्सनुसार आईफोन 11 ची किंमत ठरत होती. पण आता आईफोन 11 ची निर्मिती भारतातच झाल्यामुळे ऍप्पलला हि इम्पोर्ट ड्यूटी दयावी लागणार नाही आणि याचा थेट परिणाम Apple iPhone 11 च्या किंमतीवर होईल. येत्या काळात आईफोन 11 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा पण कमी होऊ शकते.

हा फोन चेन्नई जवळील चित्तूर मधील प्लांट मध्ये बनवला जात आहे. ईटी टेकच्या बातमीनुसार ऍप्पलने आईफोन 11 च्या निर्मितीसाठी Foxconn शी भागेदारी केली आहे आणि फॉक्सकॉनने आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये iPhone 11 चे प्रोडक्शन पण सुरु केले आहे. रिपोर्टनुसार चेन्नई व आंध्रप्रदेशच्या काही रिटेलर्सना भारतात बनलेले ऍप्पल आईफोन 11 मोबाईल विक्रीसाठी पण उपलब्ध झाले आहेत.

ऍप्पल आईफोन 11 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here