Nothing Phone (1) चा रिटेल बॉक्स आला समोर; जाणून घ्या कंपनी बॉक्समध्ये काय देत आहे

गेले कित्येक दिवस चर्चेत रचलेल्या Nothing Phone (1) स्मार्टफोनचा लाँच आता जवळ आला आहे. या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती आधीच समोर आली आहे. आता लाँचच्या एक दिवस आधी Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्सचा व्हिडीओ आणि अनबॉक्सिंग फोटोज समोर आले आहेत. या फोनचा रिटेल बॉक्स खूप पातळ दिसत आहे. आता रूमर्सनुसार, फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.

Nothing Phone (1) च्या अनबॉक्सिंग फोरोजमध्ये देखील चार्जर दिसत नाही. याआधी आलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग स्पीड मिळणार आहे. तसेच टिकटॉकवर नथिंगनं देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानुसार, आगामी Nothing Phone (1) मध्ये वेगवान अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. नथिंगचा पहिला स्मार्टफोन Phone (1) 12 जुलैला लाँच केला जाईल. नथिंग ब्रँडचा हा फोन भारतात फ्लिपकार्ट आणि Reliance Digital वरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 200MP चा कॅमेरा! शाओमी-सॅमसंग नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

Nothing Phone (1) Retail Box

युट्युबर गौरव चौधरी उर्फ टेक्नीकल गुरुजीनी एक व्हिडीओ पोस्ट करून Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्सची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की कशाप्रकारे नथिंग ब्रँडनं उज्ज्वल भविष्यसाठी फोनचा रिटेल बॉक्स रिसायकल मटेरियल आणि झिरो प्लास्टिकपासून तयार करण्यात आला आहे. या फोनच्या बॉक्समध्ये प्रिंटसाठी केमिक्लर इंकच्या ऐवजी सोयेबीन इंकचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या स्लिम बॉक्सवरून अंदाज लावला जात आहे की या फोनसह कंपनी चार्जर देणार नाही.

Nothing Phone (1) Unboxing

Nothing Phone (1) स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग फोटो ट्वीटरवर शेयर करण्यात आला आहे. या इमेजमध्ये Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्समध्ये ट्रान्सपरंट TPU केस दिसत आहे. या लीक इमेजमध्ये स्मार्टफोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट दिसत आहे. याआधी लीक झालेला एक केस स्मोक ट्रांसलूसेंट होता. म्हणजे व्हाईट कलर व्हेरिएंटसह कंपनी ट्रान्सपरंट केस देईल आणि ब्लॅक कलर व्हेरिएंट सोबत स्मोक ट्रान्सपरंट केस मिळेल. हे देखील वाचा: अंबानींच्या जियोला टक्कर देण्यासाठी येतंय अदानींचं नवीन 5G नेटवर्क?

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन

Nothing ब्रँडचा हा पहिलाच स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरसह लाँच केला जाईल. कंपनीच्या माहितीनुसार, फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर असेल जो OIS ला सपोर्ट करेल. तसेच फोनचा सेकंडरी कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर असेल. Nothing Phone (1) स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो, बॉक्समध्ये चार्जरची शक्यता कमी झाली आहे. स्मार्टफोन Android 12 वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेसवर चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here