25000 रुपयांच्या आत बेस्ट 5G स्मार्टफोन; Oppo F23, iQOO Neo 6 सह हे आहेत बेस्ट ऑप्शन (मे 2023)

इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी ह्या रेंजमध्ये काही चांगले स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. हे स्मार्टफोन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, पावरफुल प्रोसेसर, हाय क्वॉलिटी कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह येतात.

25000 रुपयांच्या बजेट मधील 5G स्मार्टफोन

Oppo F23 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 256GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695 (SDM 695)
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 24,999 रुपये

ओप्पोचा हा स्मार्टफोन 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाला लेटेस्ट स्मार्टफोन आहे. Oppo F23 5G स्मार्टफोन बोल्ड गोल्ड आणि कोल ब्लॅक आशा दोन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ओप्पोचा हा स्मार्टफोन 67W SUPERVOOCTM फ्लॅश चार्जिंगसह येतो. कंपनीचा दावा आहे की हा फक्त 18 मिनिटांत झिरो ते 50 टक्के चार्ज होतो. ह्या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते, जी 39 तास कॉल आणि 16 तास व्हिडीओ व्यूविंग एक्सपीरियंस देऊ शकते.

iQOO Neo 6 5G

  • डिस्प्ले : 6.62 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4700mAh
  • प्रोसेसर : Snapdragon 870 5G
  • रियर कॅमेरा : 64MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 24,999 रुपयांपासून सुरु

जर तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर iQOO Neo 6 5G तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा फोन क्वॉलकॉम प्रोसेसरसह येतो, ज्याचा प्रायमरी कोर A77 आर्कचेक्टर आहे, जो 3.2GHz स्पीडवर क्लॉक करण्यात आला आहे. हा अल्ट्रा फास्ट, सुपर स्टेबल आणि स्मूद गेमिंग एक्सपीरियंस देतो. फोनमध्ये E3 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M53 5G

  • डिस्प्ले : 6.7 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेनसिटी 900
  • रियर कॅमेरा : 108MP + 8MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 23,990 रुपयांपासून सुरु

Samsung Galaxy M53 मिड रेंजचा बेस्ट ऑप्शन आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये सॅमसंगनं गॅलरी अ‍ॅपमध्ये फोटोमधून वस्तू हटवण्याचं फीचर देण्यात आलं आहे. जर तुम्हाला सोशल मीडियावर फोटो शेयर करायला आवडत असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह येतो.

Redmi K50i 5G

  • डिस्प्ले : 6.6 इंच
  • रॅम : 6GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5080mAh
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 8100
  • रियर कॅमेरा : 64MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 20,999 रुपयांपासून सुरु
Redmi K50i

रेडमी के50आय 5जी स्मार्टफोनमध्ये 144Hz IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. ह्या फोनच्या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 650 निट्झ आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. रेडमीच्या ह्या फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 256GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 19,990 रुपये

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन फ्लॅट एज डिजाइनसह येतो. वनप्लसचा हा अफोर्डेबल 5G स्मार्टफोन SUPER VOOC Endurance Edition चार्जिंग आणि बॅटरी हेल्थ इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो, जी ह्या फोनची बॅटरी लाइफ सुधारते. ह्या फोनमध्ये बिल्ट इन टेंप्रेचर सेन्सर आणि स्मार्ट चार्जिंग चिप देण्यात आली आहे.

Oppo F21s Pro

  • डिस्प्ले : 6.43 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4500mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 21,999 रुपये

जर तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल तर Oppo F21s Pro तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. फोनमध्ये कॅमेरा क्वॉलिटी सुधारण्यासाठी AI चा वापर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन यूनीक डिजाइन आणि स्लिम बॉडी डिजाइनसह येतो, ज्याची जाडी फक्त 0.766cm आहे. फोनचे वजन फक्त 181g आहे.

Xiaomi 11i 5G

  • डिस्प्ले : 6.67 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5160mAh
  • प्रोसेसर : Mediatek Dimensity 920 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 24,490 रुपये

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर झालेला सर्वात फास्ट चार्जिंग फोन आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120Hz स्मूद रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे जो शानदार स्क्रोलिंग आणि अ‍ॅप स्विच एक्सपीरियंस देतो. शाओमीच्या ह्या फोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहेत.

Vivo Y100 5G

  • डिस्प्ले : 6.38 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4500mAh
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 900
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 23,999 रुपये

Vivo Y100 5G स्मार्टफोन ट्विन लेन्स रिफ्लॅक्स कॅमेऱ्यासह येतो. विवोचा हा फोन आपल्या शानदार प्रोफेशनल कॅमेरा क्वॉलिटीसाठी पॉपुलर आहे. त्याचबरोबर फोनची स्लिम डिजाइन प्रीमियम लुक देते. हा फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह जबरदस्त परफॉर्मन्स देतो.

realme 10 Pro 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Snapdragon 695 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 18,999 रुपयांपासून सुरु

realme 10 Pro 5G स्मार्टफोन 93.76% स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह येतो. रियलमीच्या ह्या फोनमध्ये 1mm चे बेजल्स मिळतात जे युजर्सच्या व्यूविंग एक्सपीरियंसची शोभा वाढवतो. तसेच हा फोन आतून व्हॅक्युम सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले ग्लूविना चिटकवण्यात आला आहे. ह्यात थिन बेजल्स पॉलिश डिजाइन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here