Amazon Great Indian Festival Finale Days: बजेट फोन मिळत आहेत आणखी स्वस्तात…

ह्या फेस्टिवल सीजनमध्ये तुम्ही बजेट रेंज मधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? संधी चांगली आहे, कारण अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज (Amazon Great Indian Festival Finale Days) मध्ये बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळत आहे. ह्या सेलमध्ये ब्रँडेड कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अ‍ॅमेझॉननं सेलसाठी ICICI Bank आणि AU Small Finance Bank सह भागेदारी केली आहे म्हणजे ह्या बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर तुम्हाला 10 टक्के सूट पण मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या बजेट स्मार्टफोनवर काय आहे डील?

Redmi A2

Deal price

रेडमी ए2 लेदर टेक्स्चर बॅक फिनिशसह येतो. फोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एआय टेक्नॉलॉजीसह 8 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा लो बजेट स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी दीर्घ बॅकअप देते. हा रेडमी फोन पाण्याचे शिंतोड्यांपासून देखील सु​रक्षित राहतो.
सेलिंग प्राइस: 6,799 रुपये
डील प्राइस : 5,299 रुपये

realme narzo N53


रियलमी नारजो एन53 फोनमध्ये 6.74-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्यात 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. कंपनीनं ह्यात यूनिसोक T612 प्रोसेसर चा वापर केला आहे, जो डेली टास्क दरम्यान स्मूद परफॉर्मन्स देतो. हा 50MP AI कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतो.
सेलिंग प्राइस: 8,999 रुपये
डील प्राइस : 7,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi 12C


Redmi 12C पण लोकप्रिय बजेट स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. कंपनीनं या डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो डेली टास्क दरम्यान स्मूद परफॉर्मन्स देतो. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो आणि स्प्लॅश रेजिस्टंटसाठी IP52 रेटिंग देण्यात आली आहे. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 50MP AI Dual कॅमेरा आहे, जो क्लियर शॉट कॅप्चर करतो.
सेलिंग प्राइस: 8,499 रुपये
डील प्राइस: 6,999 रुपये

Samsung Galaxy M04


अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंगचा हा फोन पण आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम04 मध्ये 6.5 इंच की एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 269पीपीआयला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो पी35 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा फोन अँड्रॉइड 12 सह येतो ज्यावर 2 वर्ष ओएस अपग्रेड मिळतो.
सेलिंग प्राइस : 8,499 रुपये
डील प्राइस: 6,499 रुपये

itel P55 5G


आयटेलचा हा बजेट फोन आहे, जो या सेल दरम्यान आणि स्वस्तात मिळत आहे. हा फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह येतो. ह्यात मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो दमदार परफॉर्मन्स देतो. हा मोबाइल फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल एआय ड्युअल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा ​देण्यात आला आहे. itel P55 5G फोन पावर बॅकअपसाठी 18वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 8,249 (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M13


जर तुम्ही दीर्घ बॅटरी बॅकअप असलेला कोणतीही स्मार्टफोन शोधत असाल तर गॅलेक्सी ए13 तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही वारंवार चार्ज करण्याची गरज नाही. फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय सोबतच फोन एक्सनॉस 850 चिपसेटवर चालतो.
सेलिंग प्राइसः 10,999 रुपये
डील प्राइस: 9,199 रुपये

realme narzo N55


Realme Narzo N55 बजेट मधील स्मार्टफोन आहे. हा फोन 6.72-इंच डिस्प्ले, 680 निट्स पिक ब्राइटनेस, 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी, 64MP AI रियर कॅमेरा आहे जो प्रोलाइट इमेजिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. त्यामुळे तुम्हाला लो-लाइटमध्ये देखील चांगले फोटोज मिळतात. हा फोन 5,000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह आला आहे. कंपनीनं डिवाइसमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो बेसिक गेमिंगची गरज भागवू शकतो.
सेलिंग प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये

realme narzo 50i Prime


अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा डिवाइस देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहे. रियलमी नारजो 50आय प्राइम मध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा लो बजेट मोबाइल फोन यूनिसोक टी612 चिपसेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल रियर सेन्सर आणि फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घ बॅकअप देऊ शकते.
सेलिंग प्राइस: 7,699 रुपये
डील प्राइस: 5,549 (बँक सूट के साथ)

realme C53


बजेट ऑप्शनमध्ये realme C53 देखील तुम्ही ट्राय करु शकता. हा फोन 6.74-इंचाचा HD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 108MP चा अल्ट्रा क्लियर रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C53 स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरसह येतो, जो बेसिक गेमिंगला पण सपोर्ट करतो. ह्यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
सेलिंग प्राइस: 10,150 रुपये
डील प्राइस: 8,127 रुपये (बँक डिस्काउंटसह)

TECNO Spark 9


बजेट रेंज ध्ये हा फीचर पॅक्ड स्मार्टफोन आला आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्यात 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन DTS पावर्ड स्पिकर्ससह येतो. फोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio G37 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, हा स्मार्टफोन 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस: 7,199 रुपये
डील प्राइस: 5,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here