आजकाल मोबाईल फोन खूप ताकदवान झाले आहेत यात दुमत नाही. आज फोन मध्ये शानदार प्रोसेसर सोबत मोठी स्क्रीन जास्त मेमरी आणि जास्त रॅम मिळत आहे. 3जीबी आणि 4बीजी रॅम असलेले फोन तर सहज मिळतात. परंतु फोनच्या स्पेसिफिकेशन सोबत ऍप्स आणि गेम्स सहित दुसऱ्या गोष्टी पण सुधारत आहेत आणि ते चालवण्यासाठी जास्त रॅम आणि मेमरीची गरज असते. त्यामुळे अनेक लोकांना 4जीबी रॅम पण कमी वाटतो आणि ते 6जीबी रॅम असेलेला फोन शोधतात. खाली आम्ही कमी किंमतीती येणाऱ्या अशाच 11 स्वस्त आणि दमदार फोनची माहिती दिली आहे ज्यात 6जीबी रॅम आहे.
रियलमी ब्रँडचा हा पहिला फोन आहे. कंपनी ने यात चांगले स्पेसिफिकेशन दिले आहेत. रियलमी मध्ये 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी वेरियंट लॉन्च केले गेले होते पण दोन मॉडेल बंद करण्यात आले आणि आता फक्त 6जीबी मॉडेलच सेल होत आहे. फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन सह 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.0 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो वर आधारित आहे. फोन मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट सह सादर केला गेला आहे आणि यात 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.
स्टाइल सोबत परफॉर्मेंस हवी असेल तर आॅनर 8एक्स तुमच्यासाठी बेस्ट च्वाइस असेल. फोन मध्ये 6.51—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह येते. हा फोन हुआवई च्या किरीन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 4जीबी आणि 6जीबी सह 64जीबी स्टोरेज मध्ये येतो. तसेच 6जीबी रॅम मध्ये 128जीबी स्टोरेज वेरियंट पण मिळेल. आॅनर 8एक्स इमोशन यूआई 8.5 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. फोन मध्ये 20—मेगापिक्सल + 2—मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. ड्युअल सिम आधारित आॅनर 8एक्स मध्ये 4जी वोएलटीई व्यतिरिक्त, वाईफाई ब्लूटूथ पण मिळेल. कंपनी ने हा फोन 3,750 एमएमएच बॅटरी सह सादर केला आहे.
हा फोन पण शानदार आहे. कमी रेंज मध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन सह येतो. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरियंट उपलब्ध आहेत. 6जीबी रॅम मॉडेल 64जीबी स्टोरेज सह उपलब्ध आहे. कंपनी ने हा 18:9 आस्पेक्ट रेशियो 5.99 इंचाच्या स्क्रीन सह सादर केला आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम1 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
या फोन मध्ये जास्त रॅम सह शानदार प्रोसेसर आहे. रियलमी 2 प्रो मध्ये 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे ज्याचे स्क्रीन रेजल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. यात तुम्हाला वॉटर ड्रॉप नॉच मिळेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. 6जीबी रॅम सोबत तुम्हाला 64जीबी मेमरी मिळेल. फोटोग्राफी सेगमेंट पाहता यात 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई सह येतो. तसेच सेल्फी साठी 16—मेगापिक्सलचा सिंगल सेंसर आहे. रियलमी मी 2 प्रो मध्ये तीन स्लॉट आहेत ज्यात तुम्ही दोन सिम कार्ड सोबत एक माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. तसेच फोन मध्ये 4जी सपोर्ट देण्यात आला आहे आणि तुम्ही वोएलटीई कॉलचा लाभ घेऊ शकता. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
जरी आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च झाला असला तरी कंपनी अजूनही रेडमी नोट 5 प्रो विकत आहे आणि दोन्ही फोन मध्ये जास्त फरक नाही. रेडमी नोट 5 प्रो मध्ये 5.99 इंचाचा 18:9 आसपेक्ट रेशियो असलेला फुल एचडी+ डिस्प्ले आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सल+ 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 6जीबी रॅम सह 64जीबी की स्टोरेज आहे.
कमी किंमतीती तुम्ही मोटो चा जी6 प्लस मॉडेल पण बघू शकता. 6जीबी रॅम असलेला हा फोन स्टॉक एंडरॉयड आणि सोप्प्या यूजर इंटरफेस साठी प्रसिद्ध आहे. मोटो जी6 प्लस मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 5.9-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 630 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत 6जीबी रॅम आणि 64जीबी की इंटरनल देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.पावर बॅकअप साठी 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी टर्बो पावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
शाओमी रेडमी नोट 6 प्रो पण चांगला विकल्प आहे. नोट 5 प्रो पेक्षा रेडमी नोट 6 प्रो मध्ये काही अपग्रेड मिळतील. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 6जीबी आणि 4जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी साठी एफ/1.9 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.
जर तुम्ही आॅफलाइन स्टोर वर खरेदी करणारे असाल तर ओपो एफ9 प्रो उत्तम आॅप्शन आहे. यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालतो आणि यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ओपो एफ9 प्रो मध्ये एफ/1.85 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. तसेच यात सेकेंडरी कॅमेरा 25-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट ने चार्ज करता येते.
वीवो वी11 प्रो मध्ये 6.41—इंचाची फुल एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जिचे स्क्रीन रेजल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. याच्या हॅलो नॉच वर तुम्हाला सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 64जीबी की इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोटोग्राफी साठी वीवो वी11 प्रो मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 25-मेगापिक्सलचा एआई सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी डुअल इंजन फास्ट चार्जिंग सह येते.
शाओमी मी ए सीरीजचा हा दुसरा फोन आहे. आधी कंपनी ने मी ए2 चा फक्त 4जीबी रॅम वेरियंट सादर केला होता. नंतर 6जीबी मॉडेल आणला. शाओमी मी ए2 चा 6जीबी असलेला मॉडेल 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. हा फोन एंडरॉयडवन इंटीग्रेशन सह येतो आणि यात दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट मिळतील. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
वीवो वी9 प्रो पण एक चांगला फोन आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर चालतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यासह येतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. वीवो वी9 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो.