का विकत घेऊ नये शाओमी रेडमी नोट 5 प्रो, जाणून घ्या तीन कारणे

फेब्रुवारी शाओमी ने रेडमी नोट भारतात सादर केला होता. हा लॉन्च होऊन जवळपास 3 महीने झाले होते पण फोन ची मागणी कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. आॅफलाइन स्टोर वर हा फोन लवकर मिळत नाही आणि आॅनलाइन स्टोर वरून पण लगेच आउट आॅफ स्टॉक होतो. अनेक यूजर्स आहेत जे अजूनही हा फोन घेण्यासाठी रांगेत आहेत. पण आता असे म्हणता येईल की जर तुम्ही रेडमी नोट 5 प्रो विकत घेण्याचा निर्णय घेत असाल तर कदाचित तो चुकीचा आहे. हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खाली आम्ही तीन कारणे सांगितली आहेत ज्यामुळे रेडमी नोट 5 प्रो न घेणे योग्य वाटेल.

1. झाला महाग
शाओमी ने रेडमी नोट 5 प्रो चे दोन मॉडेल भारतात लॉन्च केले गेलेले. कंपनी ने 4जीबी रॅम मॉडेल आणि 6जीबी रॅम मॉडेल सादर केले होते. दोन्ही मॉडेल मध्ये 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. 4जीबी रॅम वाल्या फोनला कंपनी ने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केले होते आणि या फोन ची मागणी सर्वात जास्त होती. पण आता कंपनी ने शाओमी रेडमी नोट 5 प्रो च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनी ने 1,000 रुपये वाढवले आहेत. 4जीबी रॅम वाला मॉडेल आता 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे यूजर्स नाराज होऊ शकतात. नेहमी असे होते की फोन जुना होताच त्यावर आॅफर दिली जाते पण इथे तर कंपनी ने किंमत वाढवली आहे.

रेडमी नोट 5 प्रो ला पर्याय उपलब्ध असतानाही ही किंमत वाढवण्यात आली आहे. आज असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 कडे पर्याय म्हणून बघितले जात आहे हा फोन भले ही कॅमेरा मध्ये थोडा मागे आहे पण यापेक्षा 4,000 रुपयांनी कमी किंमतीत उत्तम बॅटरी सह उपलब्ध आहे.

2. उशिरा होईल उपलब्ध
शाओमी रेडमी नोट 5 प्रो जरी 4 मे ला प्री आॅर्डर साठी आला असला तरी अजूनही या फोन ची उपलब्धतेचा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव माहिती दिली ज्यात स्पष्ट केले आहे की या फोन चे प्रोडक्शन वाढवले जात आहे आणि उपलब्धता सुरळीत सुरू होण्यासाठी अजून 2 ते 4 आठवडे लागतील. म्हणजे विकत घेतल्यानंतर एका महिन्यांनी हा मिळेल.

3. शाओमी मी ए2 येत आहे भारतात
मागच्या महिन्यात शाओमी ने चीन मध्ये मी 6एक्स सादर करण्यात आला होता. हा फोन भारता सहित जगातील इतर देशांमध्ये मी ए2 नावाने उपलब्ध होईल. तसेच काही आठवड्यांपूर्वीच 91मोबाइल्स ने एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि मे मध्ये शाओमी मी ए2 भारतात येणार आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही एक महिना वाट बघणार असाल तर मग नवीन फोन घेणे केव्हाही चांगले. कारण मी ए2 एंडरॉयड वन इं​टीग्रेशन सह उपलब्ध होईल आणि याला एंडरॉयड चा नवीन आॅपरेटिंग सिस्टम अपडेट पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here