वारंवार रिचार्जचा त्रास कमी करतील Jio चे हे प्लान, खर्च करावे लागतील 120 रुपयांपेक्षा कमी आणि मिळेल 740GB पर्यंतचा डेटा

अनेकांना वारंवार मोबाईल रीचार्ज करण्यास त्रास होतो. जर तुम्ही दर महिन्याला किंवा दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला रिचार्ज करण्याचा त्रास कमी करू इच्छित असाल तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जियोकडे याचे उत्तर आहे. जियोकडे दीर्घकालीन अनेक प्लान आहेत, ज्यामुळे दर महिन्याला रिचार्जचे झंझट संपून जाऊ शकते. या प्लानमध्ये ग्राहकांना किफायती किंमतीत जवळपास 1 वर्षाची वैधता मिळते. तसेच जर एका महिन्याचा हिशोब केल्यास हे प्लान खूप स्वस्त पडतात. या हिशोबाने जियोच्या प्लान्सचा खर्च 120 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर जाणून घेऊया जियोच्या वर्षभर वैधता देणाऱ्या या प्लान्समध्ये युजर्सना आणि किती फायदे मिळतात. (Best and cheapest yearly prepaid recharge plans of Jio)

5 प्लानमध्ये मिळेल एक वर्षाची वैधता

रिलायंस जियोने आपल्या पोर्टफोलियोमध्ये एक दोन नव्हे तर चार अश्या प्लानचा समावेश केला आहे जे युजर्सना वर्षभराच्या वैधतेसह कॉलिंग आणि डेटा देतात. तुम्हाला आज जियोच्या त्या पाच रिचार्जबाबत माहिती देणार आहोत जे एक वर्षाच्या वैधतेसह येतात.

हे देखील वाचा : Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 48MP फ्रंट आणि 64MP बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च, जाणून घ्या किंमत

Jio सिम कार्ड

Jio चा 1299 रुपयांचा प्लान

रिलायंस जियोकडे 1,299 रुपयांचा अप्रतिम प्लान आहे. जियोच्या या प्लानमध्ये 336 दिवसांची वैधता मिळते. या हिशोबाने या रिचार्जचा महिन्याचा खर्च 118 रुपये येतो. त्याचबरोबर यात 24GB डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यावर पण तुम्हाला 64 Kbps च्या स्पीडने डेटा मिळत राहील. या रिचार्ज प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा पण मिळते. प्लानमध्ये 3,600 SMS मिळतात. तसेच Jio युजर्सना JioTV, JioCinema, JioSaavn जैसे Jio अ‍ॅपसाठी कॉम्प्लीमेंट्री अ‍ॅक्सेस पण मिळतो.

Jio चा 2121 रुपयांचा प्लान

2,121 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जबद्दल बोलायचे झाले तर यावर्षी कंपनीद्वारे सादर करण्यात आलेला हा पहिला प्लान होता. कंपनी या प्लानमध्ये 336 दिवसांची वैधता देत आहे. या वैधतेदरम्यान रोज 1.5 जीबी हाई-स्पीड डेटा रोज (एकूण 504जीबी डेटा) दिला जातो. डेटाव्यतिरिक्त या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंग अगदी मोफत मिळते. प्लानमध्ये 100 एसएमएस रोज मिळतात. इतकेच नव्हे तर या प्लानमध्ये Jio अ‍ॅप्लिकेशन जसे कि JioTV, JioCinema आणि JioNews चा मोफत अ‍ॅक्सेस पण मिळतो.

Jio चा 2,399 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये एकूण 730GB डेटा आणि कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह डेली 100 एसएमएस मिळतात. या सर्व बेनिफिट्स व्यतिरिक्त या प्लानमध्ये युजर्सना जियो अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन पण दिले जात आहे.

Jio चा 2599 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये युजर्सना एकूण 740 जीबी डेटा दिला जात आहे म्हणजे ग्राहक हर रोज 2 जीबी डेटा वापरू शकतात. तसेच युजर्सना 10 जीबी अतिरिक्त डेटा पण मिळत आहे. या पॅकची वैधता 365 दिवस आहे. या पॅकमध्ये पण सर्व नंबरवर अनलिमिटेड वॉइस कॉलची सुविधा मिळेल. ग्राहक रोज 100 मोफत एसएमएसचा फायदा पण मिळतो. युजर्सना जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जात आहे. या पॅकमध्ये पण 399 रुपयांच्या डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत सुविधा मिळेल.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक, जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Jio चा 4999 रुपयांचा प्लान

रिलायंस जियोच्या 4999 रुपयांच्या प्लानची वैधता 360 दिवस आहे. यात ग्राहकांना एकूण 350GB डेटा मिळतो. यात पण सर्व नंबरवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळते. तसेच ग्राहकांना जियो अ‍ॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनसह एकूण 100 एमएमएस पण मिळतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here