20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी

बेस्ट गेमिंग फोन्स

सध्या स्मार्टफोनची भूमिका आपल्या धावपळीच्या जीवनात खूप महत्वाची झाली आहे. फोन फक्त कॉल करण्याचे माध्यम राहिला नसून आता आपण फोनवरून ऑफिसची कामे पण करतो. चांगल्या फोनची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. शानदार फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्सनंतर युजर्सचे लक्ष बजेटकडे वळते. जर तुम्ही पण 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक गेमिंग फोनचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आम्ही काही अश्या शानदार फोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी मोबाईल गेमिंगचा अंदाज बदलतील. बाजारात फोन तर ढीगभर आहेत त्यामुळे निवड करणे कठीण होते. जर तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही. (Best gaming smartphones under 20000)

Poco X3 Pro

POCO X3 Pro अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला होता जो मीयुआय 12 सह चालतो. गेमिंगसाठी बनलेल्या या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बालेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 860 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयूला सपोर्ट करतो. पोको एक्स3 प्रो LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची बेस किंमत 18,999 रुपये आहे. तसेच पावर बॅकअपसाठी POCO X3 Pro कंपनीद्वारे 5,160एमएएचच्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज केला गेला आहे. पोकोचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यास या फोनची बॅटरी 11 तासांचा गेमिंग टाईम आणि 18 तास व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते. फोनची मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी पोको एक्स3 प्रो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

POCO X3 Pro चा फोटो

POCO X3 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे तर दोन एफ/2.4 अपर्चर असलेले 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. ज्यात एक डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स3 प्रो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme Narzo 30 Pro 5G

16,999 रुपयांची बेस किंमत असलेला Narzo 30 Pro 5G गेमर्सचा लक्षात ठेऊन सादर केला गेला होता. कंपनीने आपली नारजो सीरीज गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केली होती. या स्मार्टफोनचा सर्वात खास फीचर 5जी कनेक्टिविटी आहे. कंपनीने यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट दिला आहे. मीडियाटेक च‍ि‍पसेट मीडियाटेक 5जी अल्‍ट्रासेव टेक्‍नोलॉजीसह येतो. या चिपसेटमध्ये 2.3जीबीपीएस पर्यंत डाउनलोड स्‍पीड मिळवण्याची क्षमता आहे. इतकेच नव्हे तर हा 7एनएम प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात डुअल क्‍लस्‍टरसह एक ओक्‍टाकोर सीपीयू आहे, ज्यात 2.4गीगाहर्ट्ज क्‍लॉक स्‍पीडसह दोन आर्म कॉर्टेक्‍स-ए76 प्रोसेसर आहेत.

realme narzo 30 pro चा फोटो

Realme चा हा फोन देशातील सर्वात किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले पॅनल आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

Redmi Note 10 Pro Max

चांगल्या गेमिंगसाठी या फोनमध्ये शानदार बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेज पावर देण्यात आली आहे. प्रोसेसिंग पाहता Redmi Note 10 Pro Max मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच Redmi Note 10 Pro मॅक्सची बेस किंमत 19,990 रुपये आहे.

Redmi NOte 10 Pro Max चा फोटो

गेमिंग सोबतच Redmi च्या या फोनमध्ये शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा सेंसर आहे. तसेच फोनच्या मागे 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये फ्रंटला 16 एमपी कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Samsung Galaxy F41

जर तुम्ही सॅमसंगचा गेमिंग फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी एफ41 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनची बेस किंमत 14,499 रुपये आहे. तर, Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच Samsung Galaxy F41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F41 चा फोटो

Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू की क्षमता असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

कंपनीने हा 14,999 रुपयांमध्ये काही दिवसांपूर्वी सादर केला होता. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला होता.

Realme 8 5G चा फोटो

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा कामगिरीच्याबाबतीत थोडा कमजोर आहे. पण, या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. एकंदरीत, तुम्हाला कम किंमतीत 5G सह एक गेमिंग फोन घ्यावयाचा असेल तर हा शानदार डिवाइस आहे. Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. यासोबत 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस. हा Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे खूप कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode ला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूंना कॅमेऱ्यात 30fps रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत

Infinix Zero 8i

हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला होता जो 6.85 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित एक्सओएस 7 वर सादर केला गेला आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेटवर चालतो. फोनमध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्सपासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आई मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी Infinix Zero 8i च्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Zero 8i चा फोटो

या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच Infinix Zero 8i ची मुख्य यूएसपी फोनचा कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो ज्यात चार सेंसर बॅक पॅनलवर आणि दोन सेंसर फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. फ्रंट पॅनल पाहता इनफिनिक्स झिरो 8आई मधील डुअल सेल्फी कॅमेरा सेटअपमध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंससह चालतो. इनफिनिक्स झिरो 8आई चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डायमंड शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here