मोफत पाहा वेब सीरीज आणि मूव्ही, फक्त डाउनलोड करा यातील कोणतंही अ‍ॅप

जेव्हा ऑनलाइन मूव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हटलं की Netflix आणि Amazon Prime Video चं नाव चटकन समोर येतं. या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर पेमेंट केल्यानंतरच कंटेंट पाहता येतो कारण दोन्ही ओटीटीवर फ्री मूव्ही आणि टीव्ही शो उपलब्ध नाहीत. परंतु तुम्हाला माहित आहे का असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जिथे कोणत्याही सब्सक्रिप्शनविना चित्रपट, वेब सीरीज आणि टीव्ही शोचा आनंद घेता येतो. हो, आम्ही तुम्हाला काही अशा प्लॅटफॉर्म्सची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही पैसे खर्च न करता व सब्सक्रिप्शनविना फ्री मूव्ही, वेब सीरीज इत्यादी पाहू शकता. तसेच तुम्ही या मोफत मूव्ही आणि टीव्ही शो तुमच्या डिवाइसवर डाउनलोड देखील करू शकता आणि ऑफलाईन देखील बघू शकता.

या अ‍ॅप्सवर मोफत पाहा Movies आणि Web Series

1. YouTube

2. MX Player

3. Disney Plus Hotstar

4. Voot

5. Sony LIV

6. JioCinema

7. Zee5

8. Vi Movies and TV

9. Crunchyroll

10. Samsung TV Plus

1. YouTube

या यादीत सर्वात पाहिलं आणि सर्वात महत्वाचं अ‍ॅप YouTube आहे. तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं, परंतु प्रोडक्शन स्टूडियो स्वतःहून अनेक चित्रपट YouTube वर अपलोड करतात आणि त्यामुळे ते मोफत पाहता येतात. अनेक हिट चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहेत. तसेच जुन्या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी तर इथे पर्वणीच आहे. भारतातील वेब सीरिजच्या क्रेझची सुरुवात देखील युट्युबवर झाली आहे, त्यामुळे इथे अनेक दर्जेदार वेब सीरिज देखील आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही अँड्रॉइड फोन, आयफोन, टीव्ही, फायर टीव्ही स्टिक किंवा डेस्कटॉपवर Youtube पाहता येतं. तुम्ही चित्रपट ऑफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड देखील करू शकता. फक्त चित्रपट पाहताना जाहिराती पाहाव्या लागतील.

2. MX Player

जर तुम्ही एमएक्स प्लेयरचे जुने युजर असाल तर तुम्हाला माहित असेल की सुरुवातीला एमएक्स प्लेयर फक्त एक ऑफलाइन व्हिडीओ प्लेयर होता. परंतु 2019 मध्ये एमएक्स प्लेयरनं ओटीटी सेगमेंटमध्ये एंट्री घेतली. प्लॅटफॉर्मवर जवळपास 150,000 तासांचा कंटेंट 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एमएक्स प्लेयरवर वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट, नॉक नॉक आणि 24 ऑवर्स टू लिव सारखे चित्रपट व सीरीज मोफत पाहू शकता.

3. Disney Plus Hotstar

डिज्नी प्लस हॉटस्टार तुमच्या स्मार्टफोन, टीव्ही, फायर टीव्ही स्टिक किंवा क्रोमकास्टवर चालतो. तुम्हाला माहित नसेल परंतु तुम्ही सब्सक्रिप्शनविना मोफत चित्रपट आणि शो बघू शकता. या प्लॅटफॉर्मवर मोफत Baaghi 3, Bang Bang, The Ice Man, तसेच Quix शो बघता येतात. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत चित्रपट आणि टीव्ही शो प्रादेशिक भाषणामध्ये देखील उपलब्ध आहेत.

4. Voot

वूट हे वायकॉम18 च्या मालकीचं एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही रोडीज, बिग बॉस, शक्तीमान आणि फौजी सारखे क्लासिक्स हिट शो मोफत बघू शकता. हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Android, iOS, KaiOS सह डेस्कटॉपवर देखील उपलब्ध आहे. वूट अ‍ॅप Roku, Amazon Fire TV, Chromecast, Apple TV आणि Android TV डिवाइसवर इंस्टॉल करता येतो. प्लॅटफॉर्मवर जवळपास 40,000 तासांचा कंटेंट फक्त भारत, अमेरिका आणि यूकेमध्ये उपलब्ध आहे.

5. Sony LIV

SonyLIV देखील एक फ्रीमियम सर्व्हिस आहे, ज्यात मराठी, कन्नड, अंग्रेजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि बंगाली सारख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये 40,000 तासांपेक्षा जास्त कंटेंट उपलब्ध आहे. तुम्ही जर्सी गोलमाल आणि खट्टा मीठा सारखे चित्रप साइन इन न करता बघू शकता. साइन इन केल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्मा, गुड नाइट इंडिया आणि मॅडम सर सारखे हिट टीव्ही शो आगामी मोफत बघू शकता. फक्त तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागतील.

6. JioCinema

तुम्ही Jio युजर असाल तर JioCinema वर फ्री सर्व कंटेंट बघू शकता. अ‍ॅपवर 100,000 तासांपेक्षा जास्त चित्रपट, टीव्ही शो आणि खूप काही आहे. इंग्लिश व्यतिरिक्त इथे मराठी, हिंदी, तामिळ, कन्नड, तेलुगु, बंगाली, गुजराती, भोजपुरी, मल्याळम आणि पंजाबीसह अनेक भारतीय भाषांमध्ये कंटेंट मिळतो. अ‍ॅपवर नाटकीय, अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि रोमांससह अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमधील चित्रपट आहेत. तसेच Jio नं SunNXT, ErosNow, Voot, ALTBalaji, Shemaroo, Playflix, आणि E सोबत देखील भागेदारी केली आहे, त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट जियोसिमेमावर बघता येईल.

7. Zee5

Zee5 या लिस्टमधील अजून एक OTT platform आहे, जिथे 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये movies आणि TV shows सह 1,00,000 तासांचा कंटेंट उपलब्ध आहे. यात Zee original shows आणि music चा समावेश आहे. तसेच Zee5 युजर्स ALTBalaji’s चा कंटेंट फ्री बघू शकतात. अ‍ॅपवर काही कंटेंट फ्री बघता येतो. प्लॅटफॉर्मवर A Flying Jatt, Ra One, and Wanted सह Jodhaa Akbar, Bhabhiji Ghar par hai आणि Pavitra Rishta सारखे टीव्ही शो फ्री स्ट्रीम करता येतील.

8. Vi Movies and TV

हे अ‍ॅप Vodafone Idea (VI) युजर्ससाठी बनवण्यात आलं आहे. विआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅप शेकडो चित्रपट आणि टीव्ही शोचं मोफत अ‍ॅक्सेस देतं. टेलिकॉम कंपनीनं लायन्सगेट प्ले, इरोज नाउ, वूट सिलेक्ट, सनएनएक्सटी, झी5, हंगामा प्ले, डिस्कव्हरी आणि युप्पटीव्ही सारख्या सेवांशी भागेदारी केली आहे. तसेच जर तुम्ही एक विआयपी सदस्य असाल तर विआय चित्रपटांव्यतिरिक्त या सर्व सेवा फ्री अ‍ॅक्सेस करता येतील.

9. Crunchyroll

Crunchyroll स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर इंग्लिश डबसह इंग्लिश सब-कंटेंट देखील आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागतील परंतु कोणत्याही सब्सस्क्रिप्शनविना कंटेन्ट पाहता येईल.

10. Samsung TV Plus

नावावरून समजलं असेल की हे अ‍ॅप सॅमसंग डिवाइससाठी आहे. मग स्मार्ट टीव्ही असो की फोन किंवा टॅबलेट असो. सॅमसंग टीव्ही प्लस एक लाइव्ह टीव्ही सेवा आहे जी तुम्हाला मोफत शो आणि चित्रपट बघू देते. यात मस्ती आणि वर्ल्ड वॉर 2 च्या डॉक्यूमेंट्रीजचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here